जनता बँक एफएसडब्ल्यूएम चे निकष पूर्ण साताऱ्यातील पहिली बँक विनोद कुलकर्णी ; ग्राहकांना लवकरच डिजिटल सेवा देणार

सातारा : जिल्ह्याची अर्थवाहिनी, सर्वसामान्यांची बँक असा नावलौकिक असणाऱ्या जनता सहकारी बँक लि.,साताराने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या कार्यालयाने निर्देशित केलेले फिनान्सीअली साउंड ॲण्ड वेल मॅनेजड(एफएसडब्ल्यूएम) चे सर्व निकष दि. ३१ मार्च २०२४ अखेरील ऑडीटेड आर्थिक पत्रकानुसार पूर्ण केले आहेत. बँकेच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळ सभा, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सभेमध्ये यासंदर्भात आवश्यक ठराव पारित करण्यात आले. आता लवकरच ग्राहकांना डिजिटल सेवा देणार असल्याची माहिती भागधारक पॅनेलप्रमुख, ज्येष्ठ संचालक व बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चे चेअरमन विनोद कुलकर्णी आणि बँकेचे चेअरमन अमोल मोहिते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

याप्रसंगी बोलताना विनोद कुलकर्णी म्हणाले, बँकेचा २०२३ - २४ या आर्थिक वर्षाचा वैधानिक लेखापरीक्षकांचा अहवाल बँकेस प्राप्त झाला आहे. बँकेच्या ऑडीटेड आर्थिक परिणामांनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या निर्देशित केलेले आर्थिक दृष्ट्या सक्षम, उत्तम व्यवस्थापन (एफएसडब्ल्यूएफ) चे सर्व निकष बँकेने पूर्ण केले आहेत. सर्व निकष पूर्ण करणारी जनता सहकारी बँक ही साताऱ्यातील पहिली बँक आहे. रिझर्व्ह बँकेच्या एफएसडब्ल्यूएम चे निकषांनुसार, बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण १२ टक्के + १ टक्के राखणे आवश्यक असताना  बँकेने ते प्रमाण २४.४७ टक्के एवढे राखले आहे. बँकेचा नेट एन. पी. ए. ३ टक्क्याच्या आत राखणे आवश्यक असताना बँकेने ते प्रमाण २.७७ टक्के राखले आहे. 

गत दोन वर्षात बँकेवर रिझर्व्ह बँकेकडून कोणतीही दंडात्मक कारवाई झालेली नाही, गत चार वर्षापैकी तीन वर्ष बँक नफ्यात असणे आवश्यक आहे, त्याप्रमाणे बँकेने नफा मिळवला आहे. गत वर्षी कॅश रिझर्व्ह रेशो, व स्टॅट्युटरी लिक्विडीटी रेशोमध्ये उल्लंघन झाले नसल्याची तसेच दोन चार्टड अकौंटंटची तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्ती संचालक मंडळावर करून सर्व निकषांची पूर्तता केली असल्याची माहिती दिली. एफएसडब्ल्यूएम चे निकष पूर्ण केल्यामुळे बँकेच्या ग्राहकांना डिजिटल ग्राहक सेवा देणे शक्य होणार आहे. त्याबाबतचे प्रस्ताव रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयास सादर करणार आहे.

याप्रसंगी बोलताना बँकेचे चेअरमन अमोल मोहिते यांनी, २०२३-२४ या आर्थिक वर्षात बँकेस १ कोटी ५ लाख ५२ हजार रुपयांचा नफा झालेला असून बँकेने संशयित बुडीत कर्ज  खात्यांची वाढीव तरतूद  १ कोटी २ लाखा एवढी केली आहे. बँकेने एफएसडब्ल्यूएम चे सर्व निकष पूर्ण करून बँक आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यात बँकेचे सभासद, ठेवीदार, खातेदार, कर्जदार,  हितचिंतक यांचा निश्चित मोठा हातभार असल्याचे नमूद केले. एफएसडब्ल्यूएम निकष पूर्ण केल्याबद्दल सर्व संचालक अधिकारी, सेवक वर्गाचे अभिनंदन केले. बँकेने चालू आर्थिक वर्षात  २५ कोटी रुपये एवढे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित केले असून त्याकरता यापूर्वीच विविध कमी व्याजदराच्या कर्ज योजना सुरु सेलेल्या आहेत, त्याचा बँकेच्या सभासदांनी जास्तीत  जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले.

याप्रसंगी बँकेचे व्हाईस चेअरमन विजय बडेकर, जेष्ठ संचालिका डॉ. चेतना माजगावकर, जेष्ठ संचालक जयवंत भोसले, श्री. आनंदराव कणसे, जयेंद्र चव्हाण, अशोक मोने, माधव सारडा, चंद्रशेखर घोडके, सौ. सुजाता राजेमहाडीक, वसंत लेवे, अविनाश बाचल, रामचंद्र साठे, रवींद्र माने, बाळासाहेब गोसावी, वजीर नदाफ, नारायण लोहार, मच्छद्रिं जगदाळे, ॲड. चंद्रकांत बेबले, अक्षय गवळी, तज्ज्ञ संचालक श्री. सौरभ रायरीकर (सीए), राजेंद्र जाधव (सीए), बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य विनय नागर (टॅक्स कन्सल्टंट), श्री. पंकज भोसले (सीए), ॲड. श्रुती कदम, सेवक संचालक अन्वर सय्यद, अभिजित साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार, अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होता.



"विनोद कुलकर्णी म्हणाले, बँकेचा २०२३ - २४ या आर्थिक वर्षाचा वैधानिक लेखापरीक्षकांचा अहवाल बँकेस प्राप्त झाला आहे. बँकेच्या ऑडीटेड आर्थिक परिणामांनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या निर्देशित केलेले आर्थिक दृष्ट्या सक्षम, उत्तम व्यवस्थापन (एफएसडब्ल्यूएफ) चे सर्व निकष बँकेने पूर्ण केले आहेत."

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त