ऑनलाईन गेम मध्ये पैसे हरल्याने मोटर सायकल चोरी करणारा वडूज पोलीसांकडून जेरबंद.
Satara News Team
- Mon 3rd Feb 2025 02:31 pm
- बातमी शेयर करा

वडूज : वडूज पोलिसांना गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहीतीच्या आधारे चोरीची मोटारसायकल विक्री करण्याकरीता ग्राहक शोधत असलेल्या इसमाची माहीती पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना मिळाली असता त्यांनी मायणी पोलीस स्टापला बनावट ग्राहक म्हणून पाठवून योग्य सापळा लावून कारवाई करण्याचे मार्गदर्शन केल्याने पो.कॉ. ब.नं. १२२४ प्रदिप भोसले यांस पेहराव बदलून त्यास मध्यस्थामार्फत मोटारसायकल खरेदी करायची आहे. असे गोपनीय बातमीतील संशयीत दुचाकी चोरणाऱ्या मुलासोबत खरेदीदार हा बनावट ग्राहक अथवा पोलीस असल्याचे किंचीतही संशय न येऊ देता संपर्क साधत मोटारसायकल चोरणाऱ्या आरोपीने सुरवातीला त्याचे ताब्यातील मोटारसायकल विक्री करण्याकरीता मायणी येथे बोलावले. त्यानंतर बनपुरी येथे बोलावले व त्यानंतर धोंडेवाडी गावाजवळ बोलावले. त्यानंतर दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी संशयीत आरोपी धोंडेवाडी गावी १२.३० वा चे सुमारास एक मोटारसायकल स्प्लेंडर कंपनीची विक्रीसाठी घेऊन आला. बनावट ग्राहक पो.कॉ. व संशयीत आरोपी यांची बोलणे सुरू होताच बाजूला पंचासह दबा धरून सापळा लावून बसलेल्या साध्या वेशातील मायणी पोलीस स्टापने त्यास मोटारसायकलसह ताब्यात घेतले.
त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता संशयीत आरोपीने त्यांचे नाव शुभम राजू निकम, वय २० वर्ष रा. माहुली ता. खानापूर जि. सांगली असे असल्याचे सांगून त्याने सदरची मोटारसायकल ही दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजीचे रात्री तुळशीराम शिवाजी कुंभार यांचे घरासमोरून चोरून आणले असल्याचे सांगितले. यावरून पोलीस स्टेशनचा अभिलेख पडताळी केले असता पोलीस ठाणे वडूज गुन्हा रजि नं ३८/२०२५ बी.एन. एस. ३०३ (२) प्रमाणे संबंधित गुन्हा दाखल आहे. मोटारसायकलचे वर्णन मोसा क्र. एम.एच.११ सी.एन ५३२२ स्प्लेंडर मोटर याप्रमाणे आहे. विक्रीसाठी आणलेली मोटारसायकल चोरीची असल्याची खात्री झाल्याने त्यास ताब्यात घेतले आहे.
त्यानंतर त्यास विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता सदर आरोपी याने दुसरी एक मोटारसायकल क्र. एम.एन.११ सी.पी. ०४५७ ही सातारा येथून चोरल्याचे सांगितलेने त्याच्याकडून सदर दोन मोटारसाकली असा एकूण १,१५,०००/- रु चा माल हस्तगत केला. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पो. हवा. ५६७ कारंडे हे करीत आहेत. यासोबतच ऑनलाईन प्रोबो गेम खेळल्याने फार नुकसान झाले असून पैसे कमी पडल्याने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपीने दिली आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक, सातारा समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक, सातारा श्रीमती. डॉ. वैशाली कडुकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, दहिवडी कॅम्प वडूज श्रीमती. अश्विनी शेंडगे यांचे मार्गदर्शनाखाली मा.पोलिस निरीक्षक,वडूज घनश्याम सोनवणे, स.पो.नि. विक्रांत पाटील, पोलिस उपनिरीक्षक कदम, पो.हवा नानासाहेब कारंडे, शशीकांत काळे, आनंदा गंबरे, अमोल चव्हाण, पो.ना प्रविण सानप, पो.कॉ. बापू शिंदे, प्रदिप भोसले, संदीप खाडे व अजित काळेल व म.पो.कॉ. प्रियंका सजगणे यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पो. हवा. नानासाहेब कारंडे हे करीत आहेत.
@crime
स्थानिक बातम्या
कारागृहातून सुटलेल्या संशयिताला नेताना जमावाची गुंडागर्दी
- Mon 3rd Feb 2025 02:31 pm
अवैध गुटखा विकणारांवर छापासत्र उंब्रज पोलीस, अन्न, औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई
- Mon 3rd Feb 2025 02:31 pm
संजीवराजेंच्या घरी आयकर विभागाचे पथक; चौकशी चालू
- Mon 3rd Feb 2025 02:31 pm
ऑनलाईन गेम मध्ये पैसे हरल्याने मोटर सायकल चोरी करणारा वडूज पोलीसांकडून जेरबंद.
- Mon 3rd Feb 2025 02:31 pm
"असे" पालकमंत्री मिळणे सातारा जिल्ह्यासाठी दुर्दैवी..
- Mon 3rd Feb 2025 02:31 pm
समाजातील लोकांनी दातृत्वाची भावना ठेवायला हवी : दत्तात्रेय इंगवले
- Mon 3rd Feb 2025 02:31 pm
संबंधित बातम्या
-
कारागृहातून सुटलेल्या संशयिताला नेताना जमावाची गुंडागर्दी
- Mon 3rd Feb 2025 02:31 pm
-
अवैध गुटखा विकणारांवर छापासत्र उंब्रज पोलीस, अन्न, औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई
- Mon 3rd Feb 2025 02:31 pm
-
शाहूपुरी पोलीस ठाणे म्हणजे अवैध धंदेवाल्यांचे माहेरघरच!
- Mon 3rd Feb 2025 02:31 pm
-
'ड्राय डे' दिवशी पोलिसांनी खाकीचीच लक्तरे वेशीवर टांगली
- Mon 3rd Feb 2025 02:31 pm
-
तीन गुन्हेगार दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार
- Mon 3rd Feb 2025 02:31 pm
-
सातार्यात चिमुरडीवर अत्याचार : पोक्सो अंतर्गत शाहुपूरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Mon 3rd Feb 2025 02:31 pm
-
संजय शेलार खून प्रकरणात एकूण ५ आरोपी ताब्यात
- Mon 3rd Feb 2025 02:31 pm
-
क्षेत्रमाहुलीत नदीकाठी रिव्हॉल्व्हरमधून हवेत फायरिंग
- Mon 3rd Feb 2025 02:31 pm