पदाला साजेल असंच काम करणार -प्रिया साबळे

शिवथर येथे बिनविरोध सरपंच निवड

शिवथर.:  तीन ते साडेतीन वर्षाच्या कालावधीमध्ये शिवथर गावाचा विकास झालेला आहे त्यामध्ये खासदार श्रीनिवास पाटील आमदार शशिकांत शिंदे व आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नातून बंदिस्त गटार डांबरीकरण काँक्रिटीकरण अशी कामे झालेली आहेत सध्या खासदार उदयनराजे भोसले यांचे फंडातून सभागृह होणार आहे. उर्वरित कामे 15 वित्त आयोगातून केली जाणार असून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सरपंच पदाला साजेल असंच काम सर्व पदाधिकारी तसेच ग्रामस्थ यांना विचारात घेऊन केले जाणार. असे प्रतिपादन सरपंच प्रिया साबळे यांनी केले. 


            सन 2020 साली शिवथर येथील जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती तसेच जिल्हा नियोजन समितीचे विद्यमान सदस्य किरण साबळे पाटील यांच्या अधिपत्याखाली ग्रामपंचायत मध्ये आठ सदस्य निवडून आलेले होते त्यापैकी चार महिला सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांना प्रत्येकी एक ते सव्वा वर्ष सरपंच म्हणून सर्वांना संधी देण्याचे काम या नेत्यांनी केल्याने त्यांचे जिल्हाभर कौतुक होत आहे आजपर्यंत कोणत्याच गावामध्ये प्रत्येकाला सरपंच पदावर बसवणं कोणालाही शक्य झालं नाही परंतु नव्यानेच त्यांनी स्वतःच्या विचाराने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सामावून घेऊन सरपंच पदासाठी या महिलांची निवड केली आजपर्यंत गेले 25 वर्षाच्या कालखंडामध्ये शिवथर गावाचा नावलौकिक देशभर करण्याचं काम सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने किरण साबळे पाटील यांनी केलेल आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रथमता संधी मिळालेल्या सरपंच रूपाली साबळे हेमलता साबळे नसीम इनामदार यांनी त्यांच्या काळात शिवथर गावाचा नावलौकिक केलाच आणि उल्लेखनीय शिवथर गावांमध्ये कामे देखील केलेले आहेत त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून उर्वरित कामे सर्वसामान्य जनतेला विचारात घेऊन आणि सरपंच पदाला शोभेल असं आणि या विभागाचे नेते किरण साबळे पाटील व शिवथर गावाचं नाव पुन्हा एकदा देश पातळीवर नेण्याचं काम मी करणार आहे असे सरपंच प्रिया साबळे म्हणाल्या. 


        त्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण साबळे पाटील ग्रामविकास अधिकारी विलासराव माने निवडणूक निरीक्षक भिंगारे निवडणूक निर्णय अधिकारी उदय कुलकर्णी माजी सरपंच रूपाली साबळे हेमलता साबळे नसीम इनामदार माजी उपसरपंच प्रकाश साबळे नवनाथ साबळे माझी गटविकास अधिकारी विलासराव साबळे माजी चेअरमन विलास साबळे माजी गटसचिव कालिदास साबळे पोलीस हवालदार संदीप साबळे उपसरपंच दत्तात्रय साबळे संतोष हवाळे संतोष कांबळे अजिंक्यतारा दूध पुरवठा संघाचे माजी चेअरमन लक्ष्मण साबळे. पाणी फाउंडेशन सदस्य संजय साबळे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त