शिक्षण प्रसारक संस्थेच्या,न्यू इंग्लिश मीडियम स्कूल करंजे पेठ येथे आषाढी वारी उत्साहात साजरी

सातारा  : अवघ्या महाराष्ट्रभर  साजरी होत असलेल्या आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी, भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत. विठुराया अन् आषाढीचे महत्त्व शाळेमधील चिमुकल्यांनाही समजावे, या उद्देशाने शनिवारी शाळेमध्ये “आषाढी एकादशी” साजरी करण्यात आली. जलसुरक्षा, व्यसनमुक्ती,पर्यावरण संरक्षण अशा विविध विषयांची घोषवाक्ये घेऊन शाळेची दिंडी काढण्यात आली. चिमुकल्यांनी विठुनामाचा जयघोष करीत त्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही दिंडीमध्ये सहभाग घेऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला.

या उपक्रमासाठी  शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा मा. सौ. वत्सला डुबल मॅडम, उपाध्यक्ष मा. श्री. जगन्नाथ किर्दत सर, उपाध्यक्ष मा. श्री.नंदकिशोर जगताप सर, संस्थेचे सचिव मा. श्री. तुषार पाटील सर व संस्थेच्या स्कूल कमिटी चेअर पर्सन मा. सौ. प्रतिभा चव्हाण मॅडम, संचालिका मा. सौ. हेमकांची यादव मॅडम, सर्व संचालक यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व पालक,करंजे ग्रामस्थ व सर्व पदाधिकाऱ्यांनी या छोट्या वारकऱ्यांचे कौतुक केले. अशा प्रकारे विठ्ठलाच्या नामघोषात शाळा माऊली दुमदुमली.

 

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला