मध्यमवर्गीय, शेतकरी, गोरगरीबांना न्याय देणारा अर्थसंकल्प
भाजपा चे सातारा जिल्हाध्यक्ष आ श्री जयकुमार गोरे यांची प्रतिक्रीया- मंगेश कुंभार
- Thu 2nd Feb 2023 12:15 pm
- बातमी शेयर करा
सातारा: उत्पन्नावरील कर सवलतीची मर्यादा वाढवून देशातील कोट्यवधी कुटुंबाना आर्थिक स्थैर्याची ग्वाही दिल्याबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासातील सर्वसामान्य जनतेचा सहभाग सुनिश्चित केला आहे, अशा शब्दांत भाजपा चे सातारा जिल्हाध्यक्ष आ श्री.जयकुमार गोरे यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले. नवीन कर प्रणाली अंतर्गत सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही, त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या हाती पैसा शिल्लक राहून त्याची क्रयशक्ती वाढेल व विकासास चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. साखर कारखान्यांनी २०१६ -१७ पूर्वी शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी दिलेले पैसे खर्च समजण्याची तरतूद करून साखर कारखान्यांच्या आयकराच्या प्रश्नावर कायमचा तोडगा काढला आहे, असेही त्यांनी नमूद केले .
आपल्या एक तास २७ मिनिटांच्या भाषणात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी गरिबांसाठी मोठी घोषणा केली. गरिबांना मोफत धान्य देण्याची योजना आणखी एक वर्ष सुरू ठेवण्याचे जाहीर करून मोदी सरकारने पालकत्वाच्या जबाबदारीचे भान जपले, असे ते म्हणाले.
या वर्षात ५० नवीन विमानतळ आणि हेलिपॅडही बांधले जातील. तरुणांसाठी ३० आंतरराष्ट्रीय कौशल्य केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. रेल्वेच्या खर्चासाठी २.४० लाख कोटी रुपये, सूक्ष्म , लघु आणि माध्यम उद्योगांना ( एमएसएमई ) ना ९ हजार कोटींची पतहमी आणि ऊर्जा सुरक्षेसाठी ३५ हजार कोटी रुपयांची हमी यांमुळे विकासाच्या गतीला चालना मिळणार असून खऱ्या अर्थाने अमृतकाळाचा आशादायक आरंभ झाला आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नास करमुक्ती, ६० लाख रोजगारांच्या संधी, गरिबांसाठी मोफत धान्य योजनेस मुदतवाढ, आदिवासींच्या विकास योजनांसाठी १५ हजार कोटींची तरतूद, पारंपरिक कारागीरांच्या कौशल्याचा सन्मान, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी डिजिटल पायाभूत सुविधा, ज्येष्ठ नागरिकांच्या बचत मर्यादेत वाढ, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा संकल्प, पर्यटनवृद्धीस प्रोत्साहन, गरीबांना हक्काचे घर देणाऱ्या पंतप्रधान घरकुल योजनेसाठी ७९ हजार कोटींची भरीव तरतूद आदी प्रस्ताव केंद्र सरकारच्या प्रामाणिक सामाजिक जाणिवेची आणि संवेदनशीलतेची साक्ष देतात असे श्री.जयकुमार गोरे यांनी सांगितले.
स्थानिक बातम्या
अंधश्रद्धेपोटी मृतदेहाचे अवशेष चारही दिशांना टाकून दाखविला नैवेद्य ?
- Thu 2nd Feb 2023 12:15 pm
खून प्रकरणात अरुण कापसेच 'शार्क मासा'
- Thu 2nd Feb 2023 12:15 pm
तारळी प्रकल्पग्रस्त मारुती जाधव यांचा प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा
- Thu 2nd Feb 2023 12:15 pm
फलटण तालुक्यातील विडणी गावाच्या शिवारात एका महिलेचा अर्धवट अवस्थेतला मृतदेह आढळला
- Thu 2nd Feb 2023 12:15 pm
दहिवडी पोलीस ठाणे जिल्ह्यात नंबर वन..
- Thu 2nd Feb 2023 12:15 pm
पुसेसावळीच्या सोळा वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कराड उत्तरचे आमदार आपल्या दारी
- Thu 2nd Feb 2023 12:15 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 2nd Feb 2023 12:15 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 2nd Feb 2023 12:15 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 2nd Feb 2023 12:15 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 2nd Feb 2023 12:15 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 2nd Feb 2023 12:15 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 2nd Feb 2023 12:15 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 2nd Feb 2023 12:15 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 2nd Feb 2023 12:15 pm