शाहूपुरी पोलीस ठाणे म्हणजे अवैध धंदेवाल्यांचे माहेरघरच!

शाहूपुरी ठाण्याची विस्कटलेली घडी बसविण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रेंसमोर आव्हान

सातारा : सातारा शहरातील वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंदेवाल्यांनी बसवलेले बस्तान रोखण्यात पोलीस सपशेल अपयशी ठरले आहेत. अवैध धंदेवाल्यांवर कारवाई करण्याऐवजी धंदेवाल्यानांच पाठीशी घालायचे काम शाहूपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी करत आहेत. त्यामुळे शाहूपुरी पोलीस ठाणे म्हणजे अवैध धंदेवाल्यांचे माहेरघरच बनले आहे. त्यामुळे शाहूपुरी पोलीस ठाण्याची विस्कटलेली घडी बसविण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रेंसामोर आव्हान बनणार आहे. 

 गुरुवारी ड्राय डे दिवशी शाहूपुरीच्या २ कर्मचाऱ्यांनी पोलीस खात्याची लक्तरे वेशीवर टांगत सबळ पुरावे देऊनही अवैध धंदेवाल्याला पाठीशी घालत कारवाईच कुचराई केली होती. परंतु पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी कान उघाडणी करताच संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. परंतु खरा सूत्रधार सोडून प्यादे पुढे करून त्याच्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे शाहूपुरी ठाण्यातील काही लाचखाऊ कर्मचाऱ्यांमध्ये थोडी हि कर्तव्यनिष्ठा उरली नाही. या कारवाईत गणेश चंद्रकांत ढोकळे रा. रविवार पेठ, सातारा याच्यावर अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आला म्हणून कारवाई करत त्यांच्याकडून पाच लाख 53 हजार 960 रुपये किंमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या आणि एक मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर एमएच १२ एफक्यू ३१३२ हि कार जप्त करण्यात आली आहे. 

 दरम्यान, शाहूपुरी पोलीस ठाण्याचा पदभार पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना सूचना देत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या तीन चक्री जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सातारा शहरातील करंजे नाका येथील ओम जेन्ट्स पार्लर सलून दुकानाच्या शेजारील शेडमध्ये सुरू असलेल्या चक्री जुगार अड्ड्यावर छापा टाकून शाहूपुरी पोलिसांनी मयूर काशिनाथ राठोड रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा याच्यावर कारवाई करत सीपीयू, मॉनिटर, की-बोर्ड तसेच रोख रक्कम असा दहा हजार चारशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दुसऱ्या कारवाईत शहरातील जुना मोटर स्टॅन्ड येथील बल्लाळ वेल्डिंग वर्क्स दुकाना शेजारी असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून निलेश सुरेश पवार रा. करंजे पेठ सातारा याच्यावर कारवाई करत दहा हजार एकशे पन्नास रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तिसऱ्या कारवाईत, सातारा शहर पोलिसांनी बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून शुभम सत्यवान कांबळे रा. विकास नगर, सातारा आणि तनवीर अश्रफ शेख रा. पिरवाडी, सातारा यांच्यावर कारवाई करत 15 हजार 130 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 मात्र, गेल्या वर्षभरात शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक अवैध धंदेवाल्याने बस्तान बसविले असल्याने हे अवैध धंदे मोडीत काढण्याबरोबरच शाहूपुरी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना लागलेल्या बेशिस्तीला लगाम घालत पुन्हा कर्तव्याची आठवण करून देत शिस्त लावण्याचे आव्हान पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रेंसमोर असणार आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त