सिक्स पॅक्स’ला स्टेरॉईडचा विळखा
Satara News Team
- Sat 13th Jul 2024 01:16 pm
- बातमी शेयर करा

सातारा : पीळदार शरीरयष्टी बनविण्यासाठी काहीही करायची तयारी असलेल्या तरुणाईसाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेतलेली सप्लिमेंट किंवा औषधे धोकादायक ठरू शकतात. या औषधांमुळे ऐन तारुण्यात हृदयविकाराच्या धोक्याला सामोरे जाऊ शकते.
त्यामुळे मेफेंटरमाईन सल्फेट, स्टेरॉईड यासारख्या औषधांचे सेवन करण्यापासून लांब राहणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून याबाबत सातत्यपूर्ण तपासणी मोहीम राबवीत जिमच्या माध्यमातून घातक पदार्थाची विक्री होत नाही ना, याकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
1) पीळदार शरीराचे आकर्षण
तंदुरुस्त शरीर यापेक्षा पीळदार व आकर्षक आणि डौलदार शरीराचे तरुणाईमध्ये आकर्षण आहे. त्यामुळे पारंपरिक व्यायामाच्या पद्धतीच्या तुलनेत जिममध्ये जाण्याकडे युवकांचा कल आहे. त्यातही शरीरावर होणाऱ्या परिणामांचा विचार न करता कोणत्याही थराला जाण्याची मानसिकता धोकादायक आहे. त्यातूनच औषधे व अप्रमाणित सप्लिमेंटचा वापर केला जातो. तो अनेकदा धोकादायक ठरलेला आहे.
2) पक्षाघाताचा धोका
धोकादायक औषधे व फूड सप्लिमेंटचा सर्रासपणे तरुणाईकडून वापर होतो. या औषधांच्या अतिसेवनाने हृदयावर परिणाम होतो, तसेच स्नायूही ताणले जातात. या पदार्थांचा वापर बंद केल्यावर स्नायू एकदम आकसतात. त्यामुळे हृदयरोगाबरोबरच पक्षाघाताचा झटका येण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आहारतज्ज्ञही यांचे सेवन करू नये, असेच सांगतात. अशा औषधांची व प्रोटिनची शरीराला गरजच नसते व ही गरज इतर नैसर्गिक पदार्थांमधून भरून काढण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे.
3) किडनी अन् डोळ्यावरही परिणाम
जिममध्ये मिळणाऱ्या प्रोटिन्समध्ये बऱ्याच वेळा ॲनाबोलिक स्टेरॉईड नामक गोष्टींची भेसळ केली जाते. ज्यामुळे शरीर दिसायला पीळदार तर दिसते; परंतु ते आतून पोखरले जाते. या प्रोटिन्सव्यतिरिक्त मेफेंटरमाईन, इफेड्रिन या स्वरूपाची इंजेक्शन दिली जातात. त्यामुळे बऱ्याच वेळा किडनी खराब होणे, हृदयविकाराचा झटका येणे, डोळ्याची दृष्टी जाणे यासारखे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी औषधे घेणे धोकादायक आहे.
युवकांना शरीर कमवायचेच असेल, तर ते नैसर्गिक पदार्थांच्या मदतीने करायला हवे. प्रथिने घ्यायची असतील तर ती ऑरगॅनिक आणि नैसर्गिक स्वरूपाची असावीत. अंडी, चिकन तसेच शाकाहारी लोकांसाठी ब्रोकोली, सोयाबीन, कडधान्य व डाळी आदी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे व सप्लिमेंट घेण्याचे टाळले पाहिजे.
- डॉ. रमेश चौगुले, हृदयरोग तज्ज्ञ
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील ०३ खेळाडुंची राष्ट्रीय स्पर्धेकरीता महाराष्ट्र संघातुन निवड
- Sat 13th Jul 2024 01:16 pm
शिखर शिंगणापूरमधील आमरण उपोषण अखेर स्थगित!
- Sat 13th Jul 2024 01:16 pm
औंध ग्रामीण रूग्णालयातील ऑक्सिजन वर असलेल्या व्यवस्थेने घेतला नवजातचा बळी?
- Sat 13th Jul 2024 01:16 pm
श्रीपतराव पाटील हायस्कूलचा यश निकम सुवर्णपदकाचा मानकरी
- Sat 13th Jul 2024 01:16 pm
डीवायएसपी मॅडमच्या आदेशाला पोलीस कर्मचाऱ्यांचा कोलदांडा
- Sat 13th Jul 2024 01:16 pm
खूनप्रकरणी दोघा संशयितांना लोणंद पोलीसांकडून एका तासात अटक
- Sat 13th Jul 2024 01:16 pm
संबंधित बातम्या
-
शिखर शिंगणापूरमधील आमरण उपोषण अखेर स्थगित!
- Sat 13th Jul 2024 01:16 pm
-
वडी ता.खटाव येथील पारायण सोहळा दि.१४ तर मुख्य यात्रेस दि.२१ पासून प्रारंभ
- Sat 13th Jul 2024 01:16 pm
-
श्रीपतराव पाटील हायस्कूलचा यश निकम सुवर्णपदकाचा मानकरी
- Sat 13th Jul 2024 01:16 pm
-
शिवडे फाटा अंधारातच! यात्रेपूर्वी लाईट सुरू न झाल्यास शिवसेनेचा इशारा — आंदोलन अटळ!
- Sat 13th Jul 2024 01:16 pm
-
पुसेसावळी दुरक्षेत्राच्या खाकीची चर्चा अन् कौतुकही.
- Sat 13th Jul 2024 01:16 pm
-
गोविंद मिल्कच्या आयकर तपासणीबाबत महत्वाची माहिती समोर
- Sat 13th Jul 2024 01:16 pm
-
वडोली निळेश्वर येथील महिला मेळाव्यातून महिला सशक्तिकरण व सबळीकरणाचा नारा
- Sat 13th Jul 2024 01:16 pm