*चांगल्या सवयी व चांगले विचार यशस्वी होण्याचा मंत्र -डॉ .श्री सुरेशराव जाधव    

पुसेगाव : " विद्यार्थ्यांनी बालवयापासूनच पुरेसा व्यायाम ,सकस आहार व अभ्यासात नियमितपणा ठेवावा . आपले बोलणे , चालणे, वागणे आदर्शवत ठेवावे. अपयशाची भीती न बाळगता स्पर्धेत उतरावे . स्वतःस सिद्ध करावे .चांगल्या सवयी व चांगले विचार आपणास आयुष्यात यश प्राप्त करून देतात व हाच यशस्वी होण्याचा मंत्र आहे . "  असे विचार सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगावचे अध्यक्ष डॉ . श्री सुरेशराव जाधव यांनी पुसेगाव येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री हनुमानगिरी हायस्कूल पुसेगाव मधील पालक सभेत व्यक्त केले . यावेळी डॉ . श्री सुरेशराव जाधव , संस्था सचिव मा. श्री मोहनराव जाधव तसेच जेष्ट संचालक श्री विश्वनाथराव जाधव  यांचे हस्ते जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाल्याबद्दल रितेशराज मोळे ,हिंदी भाषा स्पर्धेत जिल्हयात तृतीय आल्याबद्दल कुमारी भक्ती ठोंबरे तसेच कुमारी तसलीम आत्तार हिची जिल्हास्तरावर थांगता स्पर्धेसाठी  पंच म्हणून निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला . संस्था उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव यांनी ग्रामीण भागात संस्था राबवत असलेले आदर्श उपक्रम यामूळे विद्यार्थी दरवर्षी यश प्राप्त करत आहेत . हुषार , गरजू विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी सहकार्य संस्था करत असते असे विचार मांडत दूरध्वनीवरून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले .श्री प्रकाश ठोंबरे , सौ . शैला नलवडे , सुरेखा कुंभार , सौ रुपाली गुरव , सौ हेमलता तांबे , श्री उमेश डुबल यांनी पालक मनोगते व्यक्त केली . पर्यवेक्षक श्री मोहनराव गुरव यांनी स्वागत केले . प्राचार्य श्री सुधाकर माने यांनी पालक शिक्षक संघाच्या नवीन कार्यकारणीस शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला . श्री मोमीण एफ . सी . व श्री जाधव एस .जी . यांनी शिक्षक मनोगते व्यक्त केली .श्री घुगरे वाय. ए . यांनी सूत्रसंचालन केले . श्री घाटगे आर .आर . यांनी आभार मानले . सभेस पालक , शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने उपस्थित होते .

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त