गोंदवले येथील सुरज शीलवंत यास आत्महत्यास प्रवृत्त करणाऱ्या फरार तीन आरोपींना अटक...

दहिवडी पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या संयुक्त पथकाची कामगिरी....

आंधळी : गोंदवले खुर्द येथील सावकारीच्या त्रासाला कंटाळून सुरज शीलवंत यांनी आत्महत्या केले बाबतची तक्रार देण्यात आली होती त्यानुसार रजिस्टर ३१७/२०२४ भा.दं.वि.स.क ३०६ ॲट्रॉसिटी ॲक्ट, सावकारी ॲक्ट  प्रमाणे  दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


     सदर गुन्ह्यातील आरोपी यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालय वडूज यांनी फेटाळल्यानंतर सुद्धा  आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होते. आरोपींना पकडण्यासाठी सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी आरोपी अटक करण्याबाबत सक्त सूचना दिल्या होत्या. 


  त्यानुसार दहिवडी पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे संयुक्त पथक तयार करून  फरार आरोपींना पकडण्यासाठी तपास सुरू करण्यात आला त्याचा अनुषंगाने  मागील महिन्यामध्ये या गुन्ह्यातील दोन आरोपी संजय शेंडगे व आदर्श कट्टे हे इंदोर (मध्यप्रदेश) येथून खबऱ्यामार्फत आणि मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणाचा उपयोग करून पकडून अटक करण्यात आली होती. 


   तसेच सदर गुन्ह्यातील राहिलेले तीन आरोपी १) आशुतोष आनंदराव कट्टे,२) शिवतेज सुरेश कट्टे, ३) रामदास उर्फ राम मालोजी कट्टे सर्व रा. गोंदवले बु.ता.माण, जि. सातारा  हे गुन्हा घडल्यापासून फरारी होते त्यांना नेमण्यात आलेल्या संयुक्त पथकाच्या टीमने ताब्यात घेऊन अटक केली असून आज न्यायालयात पोलीस कस्टडी रिमांडसाठी हजर केले जाणार आहे. 
   सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कोडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पो. हवा. रामचंद्र तांबे, रविंद्र बनसोडे, गणेश पवार यांनी केली आहे. 

 

अटक करण्यात आलेल्या फरार संशयितासमावेत समावेश पोलीस अधिकारी व कर्मचारी
 (छायाचित्र : विशाल गुरव पाटील)

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त