लोकनियुक्त सरपंच स्व. सुंदर घाडगे यांचा स्मृतिदिन

देशमुखनगर : सातारा तालुक्यातील कामेरी गावचे लोकनियुक्त  कै. सुंदर घाडगे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ग्रामस्थांच्या आणि मित्रमंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
    जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला या म्हणीप्रमाणे सुंदर घाडगे हे कामेरी ता. सातारा गावचे नव्हे तर परिसरातील सर्वच गावातील लोकांना सुसभवाने  आवडले होते. गावच्या राजकारणात सर्वांच्या मनपसंतीने   लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले होते. अत्यंत मनमिळावू आणि दांडगा जनसंपर्क बरोबर प्रत्येकाच्या मदतीला सतत पुढे येणारे सुंदर आबा वयाच्या 44 व्या वर्षीच अल्पशा आजाराने सोडून. याला आज एक वर्ष होत आहे. त्यांच्या स्मृतीस आठवणी देण्यासाठी ग्रामस्थ आणि मित्र मंडळ यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन कामेरी येथे करण्यात आले आहे. यामध्ये रक्तदान शिबिर, सकाळी ह. भ. प. शंकर महाराज माने रा. कुसवडे तर रात्री चांडाळ चौकडी बारामती वेबसीरीज फेम बाळासाहेब उर्फ ह. भ. प. भरत महाराज शिंदे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त