सर्तक पोलीसांमुळे जबरी चोरी करुन पळून गेलेला आरोपी ०२ तासात जेरबंद

३०,०००/ रुपयेचा मुद्देमाल हस्तगत ....उंब्रज पोलीसांची कारवाई.

उंब्रज : दिनांक १९/०९/२०२४ रोजी रात्रौ ०९.०० वा. सुमारास फिर्यादी नामे पवनकुमार ओरी लाल वय-२१ वर्ष रा.माउली अपार्टमेंट चोरे रोड उंब्रज ता. कराड जि. सातारा मुळ रा. साडे कला सार खुर्द संत कबीरनगर सखन्डे खुर्द उत्तर प्रदेश हे त्यांचा मित्र हे पान घेणेसाठी थांबलेले असता राहुल मोहन आटोळे वय- २४ वर्ष रा. लक्ष्मीनगर उंब्रज ता. कराड याने दगडाने दुखापत करणेची भिती दाखवुन फिर्यादी याचे पॅन्टचे खिशातील रु.३०००/- किंमतीचा एक ऑपो कंपनीचा मोबाईल जबरीने हिसकावून घेवून पळून गेला होता. त्या बाबत त्यांचे विरुध्द उंब्रज पोलीस स्टेशनला गु. र. नं. ४३६/२०२४ भा.न्या. संहीता कलम ३०९ (४) प्रमाणे दाखल करणेत आलेला होता.

सदर तक्रार दाखल झाले नंतर श्री. रविंद्र भोरे सहा. पोलीस निरीक्षक उंब्रज यांनी पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले, पो. हवा. ८५० भोसले पो.कॉ.१११० थोरात, पो. कॉ. २३६६ कोळी, चालक पो. हवा. १३०४ साठे, यांना उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करुन आरोपीचा व मोबाईलचा शोध घेणे बाबत यांना सुचना दिल्या त्याप्रमाणे पोलीस स्टाफ हे उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना मौजे उंब्रज ता. कराड गावचे हद्दीत उंब्रज बाजारपेठ येथे एक संशयीत इसम मिळून आल्याने त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव राहुल मोहन आटोळे रा. उंब्रज ता. कराड असे सांगितले असता त्यांचेकडे विचारपुस करुन त्याचेकडे मिळून आला मोबाईल बाबत विचारता त्याने सदर मोबाईल बाबत कोणतीही उपयुक्त माहिती सांगितली असलेने त्यास उंब्रज पोलीस स्टेशन येथे घेवून येवून त्याचे जवळ मिळून आले मोबाईलची खात्री केली असता सदर मोबाईल हा पवनकुमार ओरी लाल यांचा असून असल्याची खात्री झाली. सदर गुन्ह्याचे तपास कामी आरोपी चे नाव मोहन आटोळे वय- २४ वर्ष रा.लक्ष्मीनगर उंब्रज ता. कराड यास सदर गुन्ह्यचे तपास कामी अटक करणेत आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री. सागर खबाले पोलीस उपनिरीक्षक उंब्रज पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक साो, सातारा श्री. समीर शेख साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक साो, वैशाली कडूकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो, श्री. अमोल ठाकुर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले, पो. हवा. संभाजी साठे, पो. हवा. दिनेश भोसले, पो. कॉ. मयुर थोरात, पो. कॉ. राजकुमार कोळी यांनी केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त