सायबर सुरक्षा अंतर्गत कर्मचार्‍यांमंधे जनजागृतीपर धडे

सातारा : वर्ये येथील रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिटय़ूट ऑफ  मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सातारा आणि क्विक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने "सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा" या प्रकल्पा अंतर्गत विदयार्थीनी प्रणाली अभिजित पवार व श्रेया समाधान शेडगे  यांनी बारटक्के इलेक्ट्रोफॅब, सातारा येथे कर्मचाऱ्यांना व कामगारांना सायबर  गुन्हे कसे होतात, तसेच तसे झाल्यास आपण काय केले पाहिजेल याचे धडे  तेथील असणाऱ्या  कर्मचाऱ्यांना दिले आणि  जनजागृती केली. 

    वेगवेगळ्या सायबर गुन्ह्याची माहिती करून देणे तसेच त्या गुन्ह्यापासून कसे सुरक्षित राहिले पाहिजे याची माहिती देण्यासाठी सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या प्रकल्पा अंतर्गत जनजागृती करत लोकांना मदत केली आहे.

    कर्मचाऱ्यांना अनेक सायबर गुण्यांबद्दल माहिती देण्यात आली जसे फायनान्शिअल  फ्रॉड, सोशल मीडिया फ्रॉड, मालवेअर, दीपफेक, इ. आणि यावर सायबर गुन्हा घडल्यावर आपण कुठे रिपोर्ट करावे यांचीही माहिती तेथील  कर्मचाऱ्यांना देण्यात आली. 

    बारटक्के कंपनीच्या एच.आर‍ आकांक्षा वाईकर यांच्या सहकार्यामुळे "सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा " हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

    या उपक्रमासाठी संस्थेचे संचालक डॉ. बी. एस  सावंत (डायरेक्टर) यांनी विशेष पुढाकार घेतला आणि महत्वपूर्ण सहकार्य दिले त्यांच्याच मार्गदर्शनामुळे हा उपक्रम प्रभावी पणे राबवता आला . कंप्यूटर विभाग प्रमुख डॉ. आर डी कुंभार (एच ओ डी).आणि पी.ए. लोखंडे यांच्या सहकार्याने हा उपक्रम चालू आहे . त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर  सुरक्षितेवर मार्गदर्शन केले .

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला