अंगणवाडीतील चिमुकलीचा बुडून मृत्यू; शाळकरी बंधू बेपत्ता

वडूज : खटाव तालुक्यातील शिरसवडी येथील अंगणवाडीत शिकणाऱ्या चिमुकलीचा उरमोडी कॅनॉलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तर तिच्या बरोबर असणारा शाळकरी बंधू अद्याप बेपत्ता आहे. याबाबतची अधिक माहिती शिरसवडी येथील खोलओढा शिवारातील शिवाजी नाना इंगळे यांचा सात वर्षाचा मुलगा गणू व पाच वर्षाची मुलगी रिया हे दोघे शाळेतून घरी परत येताना हा अपघात घडला असल्याची चर्चा आहे. 

 मयत रिया ही गोपूजवाडा येथिल अंगणवाडीत तर बेपत्ता गणू हा शिरसवडी भागशाळेत इयत्ता दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत होता. मंगळवारी शाळा सुटल्यानंतर दुपारी साडेबाराच्या दरम्यान तळवस्ती येथे ही दोन्ही भावंडे बेपत्ता झाली होती. त्यातील पाच वर्षाची मुलगी रिया हीचा मृतदेह शिरसवडी व गोपूज गावच्या शिवेवर असणाऱ्या शेरीवस्ती येथिल उरमोडी कॅनॉलच्या पाण्यामध्ये आढळून आला. तर मुलगा गणू याचा शोध अजून चालू आहे. शिरसवडी ते सिद्धेश्वर कुरोली या दरम्यान कॅनॉल परिसरात कोणाला आढळल्यास वडूज पोलिस स्टेशन ला कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

या प्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून मयत रियाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.तर बेपत्ता गणूचा शोध घेण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने रात्री उशिरा पर्यंत पोलीसांचे प्रयत्न सुरू होते. मात्र पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शोध कार्यात अडथळा येत आहे. शासकीय आपत्ती निवारण पथकाकडे आवश्यक यंत्रणा नसल्याने सातारा येथिल शिवेंद्रराजे भोसले स्ट्रेकिंग क्लबला मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. त्यांचे पथक बुधवारी सकाळ पर्यंत खटाव तालुक्यात दाखल होईल अशी माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त