पुसेसावळीच्या सोळा वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कराड उत्तरचे आमदार आपल्या दारी
दर तीन ते चार महिन्यांनी असाच जनता दरबार घेतला तर कुपोषित असलेला विकास गुटगुटीत होईलआशपाक बागवान
- Fri 17th Jan 2025 07:16 pm
- बातमी शेयर करा

पुसेसावळी : खटाव तालुक्याचे विद्यमान आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर आमदार असतानाच तालुक्याचे एक घाव विधानसभेचे तीन तुकडे झाले आणि लगतच्या विधानसभा मतदारसंघात जोडण्यात आले. यावेळी बहुतांश पुसेसावळी जिल्हा परिषद गट कराड उत्तर मध्ये सामील झाला. त्यानंतर सलग तीन टर्म असलेल्या आमदारांनी जनता दरबार घेणे सोडाच परंतु त्यांच्या दरबारी गेलेल्या एकदिवसीय मतदार आणि पाच वर्षे बेरोजगार असलेल्या मतदार राजा ची कैफियत ऐकण्यापुर्वी संबंधित विभागातील नेत्यांना "आलेली व्यक्ती आपली आहे काय?" असा प्रश्न विचारून समस्येवर मात करायची कि समस्या वाढवायची? हे ठरवत असे.
सोळा वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पुसेसावळी येथे नवनिर्वाचित आमदार मनोज घोरपडे यांनी जनतेचे प्रश्न, तक्रारी समक्ष समजावून घेणे तसेच संबंधित विभागाचे निर्णयक्षमता तालुकास्तरीय वरिष्ठ असलेले अधिकारी यांच्या समक्ष त्यांचे निरसन करण्याचे काम कराड उत्तर चे नवनिर्वाचित आमदार मनोज घोरपडे यांनी केले. यावेळी उपस्थित तक्रारदार आणि ग्रामस्थ कोणत्या पक्षाचा, जातीचा आहे याची चौकशी न करता समस्या, तक्रार काय आहे? यावर भर देत शेकडो तक्रारी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा उपस्थितांना अनुभव आला. यावेळी कामाचा आमदार निवडायला उशीर केल्यानेच पुसेसावळी भागाचा "विकास कुपोषित" राहिला, असाच जनता दरबार दर तीन ते चार महिन्यांनी भरवला तर पुसेसावळी भागाचा "विकास गुटगुटीत" होईल अशा पद्धतीची चर्चा सुरू होती.
यावेळी आमदार मनोज घोरपडे यांचे सोबत व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, वर्धन कारखान्याचे संचालक विक्रमशील कदम, महेश घार्गे, वडुज बाजार समिती संचालक, श्रीमती बाई सर्जेराव माने, तहसिलदार खटाव, हे उपस्थित होते. यासोबतच कृषी विभाग, महसूल विभाग, लाडकी बहिण, पी.एम.किसान, वनविभाग, पंचायत समिती विभाग, आरोग्य विभाग, पाटबंधारे विभाग, पुरवठा विभाग, पोलिस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, भुमी अभिलेख विभाग, विद्युत वितरण विभाग इत्यादी विभागाचे तालुका स्तरावरील अधिकारी आणि त्यांचे सहकारी कर्मचारी आणि शासकीय कार्यालयात हेलपाटे मारूनही कामे होत नसल्याने हतबल झालेले पिडीत, शोषीत तक्रारदार यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
स्थानिक बातम्या
कारागृहातून सुटलेल्या संशयिताला नेताना जमावाची गुंडागर्दी
- Fri 17th Jan 2025 07:16 pm
अवैध गुटखा विकणारांवर छापासत्र उंब्रज पोलीस, अन्न, औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई
- Fri 17th Jan 2025 07:16 pm
संजीवराजेंच्या घरी आयकर विभागाचे पथक; चौकशी चालू
- Fri 17th Jan 2025 07:16 pm
ऑनलाईन गेम मध्ये पैसे हरल्याने मोटर सायकल चोरी करणारा वडूज पोलीसांकडून जेरबंद.
- Fri 17th Jan 2025 07:16 pm
"असे" पालकमंत्री मिळणे सातारा जिल्ह्यासाठी दुर्दैवी..
- Fri 17th Jan 2025 07:16 pm
समाजातील लोकांनी दातृत्वाची भावना ठेवायला हवी : दत्तात्रेय इंगवले
- Fri 17th Jan 2025 07:16 pm
संबंधित बातम्या
-
संजीवराजेंच्या घरी आयकर विभागाचे पथक; चौकशी चालू
- Fri 17th Jan 2025 07:16 pm
-
माण खटावमधील प्रभाकर देशमुख, घार्गेंसह राष्ट्रवादी झाली दुबळी
- Fri 17th Jan 2025 07:16 pm
-
साहेब, जिल्ह्याचे मालक नको तर पालक व्हा..
- Fri 17th Jan 2025 07:16 pm
-
शिव आरोग्य सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आढावा बैठक पार
- Fri 17th Jan 2025 07:16 pm
-
अजितदादा आणि शरद पवार गटाची कोरेगावात जमली गट्टी
- Fri 17th Jan 2025 07:16 pm
-
सहकार विभागाशी निगडीत सर्व संस्थांचा कारभार पादर्शक असावा - मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील
- Fri 17th Jan 2025 07:16 pm
-
अंगापुरच्या मनमानी उपसरपंचावर अविश्वासचा ठराव
- Fri 17th Jan 2025 07:16 pm