खून प्रकरणात अरुण कापसेच 'शार्क मासा'

कापसेनेच दिली खुनाची सुपारी; पैलवान रामचंद्र दुबळे याची कोर्टासमोर कबुली

सातारा : गेल्या १५ दिवसांपासून अंधारी येथील संजय शेलार खूनप्रकरणात अनेक पैलू समोर येत आहेत. शेलार यांच्या खूनप्रकरणात सुरवातीला संशयाची सुई हॉटेल जलसागरचा अरुण कापसे याच्या भोवती फिरत असताना पोलिसांनी अरुण कापसेला अटक करून सबळ पुराव्याअभावी त्याचा जमीन ही करून दिला. मात्र दुसऱ्याच दिवशी संजय शेलार खून प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने धाराशिव जिल्ह्यातून पैलवान रामचंद्र दुबुले याच्या मुसक्या आवळल्या. सुरवातीला दुबळे याने मीच शेलार यांचा खून केल्याची प्राथमिक कबुली दिल्याने नवा ट्विस्ट निर्माण झाला होता. मात्र न्यायालयासमोर दुबळेने अरुण कापसेच्या सांगण्यावरूनच आपण संजय शेलार यांचा खून केल्याचा कबुली जबाब दिला असून तसेच यासाठी कापसेकडून १५ लाख रुपये मिळणार असल्याचेही त्याने सांगितले. त्यामुळे आता संजय शेलार खून प्रकरणात अरुण कापसेच 'शार्क मासा' असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. 

 संजय शेलार यांचा प्रत्यक्षात खून करणाऱ्या पैलवान रामचंद्र दुबळे याने न्यायालयासमोरच कापसेने खुनाची सुपारी दिल्याचे कबूल केले. त्यामुळे अरुण कापसे याला जेरबंद होण्यापासून आता कोणतीच यंत्रणा वाचवू शकत नाही. दरम्यान २ जानेवारीला खून झाला असताना सुद्धा तब्बल १५ दिवस यात कोणालाच अटक न झाल्यामुळे सातारा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उठवले जात होते. सातारा एलसीबीने मुख्य संशयित अरुण कापसेला जेरबंद केले असले तरी गुरुवारी तांत्रिक मुद्यांवर त्यांची सुटका झाली. या गंभीर प्रकरणात अरुण कापसेच मुख्य सूत्रधार असल्याचे अखेर समोर आले आहे. 

 दरम्यान, संपर्कासाठी दुसऱ्याच्या मोबाईलचा वापर मृत संजय शेलारला वाईतून अंधारीपर्यंत घेऊन जात त्याचा खून करताना आरोपींनी बरीच दक्षता बाळगली. वाईतून निघाल्यापासून ते परत येईपर्यंत नामचिन गुंड पैलवान रामचंद्र दुबुले याने या कामासाठी त्याचा मेहुणा की जो बिचारा ऊसतोड कामगार आहे त्याच्या मोबाईलचा आणि अन्य एका ऊसतोड कामगाराच्या मोबाईलचा वापर केला. स्वतःचे लोकेशन चुकवण्यासाठी पैलवान दुबुले याने केलेला हा प्रयत्न पोलिसांनी उघड केला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त