मोठी स्वप्न पहातांना देहभान आणि स्वभान असणं आवश्यक -डॉ.बी.एम.हिर्डेकर

देशमुखनगर :  विद्यार्थ्यांनी मोठ्यात मोठी स्वप्ने पहावित व ती सत्यात उतरवण्यासाठी देहभान आणि स्वभान असणं आवश्यक आहे.
असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील  माजी परीक्षा नियंत्रक मा.बी.एम.हिर्डेकर
 यांनी केले. ते आर्टस् ॲण्ड कॉमर्स कॉलेज, नागठाणे आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 
"ज्ञानविस्तार व्याख्यानमाला मानव्य"  या व्याख्यानमालेत 'उच्च शिक्षण, उद्यमशीलता, रोजगारक्षमता: २१ व्या शतकातील आव्हाने आणि संधी' या विषयावर ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
         ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वतः मधील सुप्त गुण व कौशल्य ओळखून जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर अशक्य गोष्टी साध्य करता आल्या पाहिजेत. तसेच उद्योग, व्यापार, व्यवसाय, मिडिया, पर्यटन आणि साहित्य इत्यादी क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात संधी आहेत. त्या संधीचा शोध घेऊन त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे.
               कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रो.डॉ.सतीश घाटगे म्हणाले की, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा आदर्श घेऊन रोजगार शोधण्यापेक्षा रोजगार देणारं कर्तृत्व निर्माण केलं पाहिजे. तसेच परिस्थितीशी रडत न बसता गरिबीच्या उरावर बसून श्रीमंतीची स्वप्नं बघीतली पाहिजे.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. अजितकुमार जाधव यांनी केला. आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.संतोष निलाखे यांनी तर  सूत्रसंचालन प्रा.डॉ. राजाराम कांबळे यांनी केले.
           कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष .गणेश साळुंखे, उद्योगजक सचिन साळुंखे, बाळासाहेब पवार, अब्दूल सतार ग्रामस्थ तसेच महाविद्यालयातील गुरूदेव कार्यकर्ते, विद्यार्थी,विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त