वी केअर फाउंडेशनच्या वतीने जि.प. शाळा ठक्करनगर (नागेवाडी) येथे शालेय वस्तूंचे वाटप

सातारा : संपूर्ण देशभरात ७६ वा प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. वुई केअर फाउंडेशन, सातारा यांच्यावतीने ठक्करनगर नागेवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत प्रजासत्ताक दिन साजरा केला. 

यावेळी वी केअर फाउंडेशनचे सदस्य यांच्यासह सरपंच सुरेखा पवार, शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा प्रशांत मोरे, उपशिक्षक कुलदीप शरद मोरे व शिक्षक यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

यावेळी सामाजिक संस्था म्हणून काम करत असलेल्या वी केअर फाउंडेशनकडून जिल्हा परिषद शाळेस बस्कर, फळे, पेन, वह्या, पाण्याची टाकी, खाऊ, आदी, शालेय उपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले. वी केअर फाउंडेशनकडून अनेक सामाजिक उपक्रम वारंवार राबवित असून रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, गोर-गरीब विद्यार्थ्यांना मदत, स्वच्छता मोहीम यांसह अनेक सामाजिक उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे. 

  यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून १० अ वेबसिरीज फेम प्राजक्ता पार्टे, प्रसाद (दादा) भोसले, श्रेयस महामूलकर, सुरज सूर्यवंशी, अभि वंजारी, धिरज अलगुडे, रश्मी दळवी, वर्षाराणी पवार, मोनिका लावंड, ऋतुराज जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.



आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला