मोबाईल फोनवरून महिलेस लज्जास्पद व अश्लील बोलणाऱ्या इसमावर कारवाई करण्याची मागणी : विश्वास मोरे

कोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस ठाणेअंमलदार वरील प्रकारे अश्लील भाषेतील बोलल्याला निंदनीय प्रकार त्याबाबत गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ करीत असल्याने पोलीस उपविभागीय अधिकारी कोरेगाव व महाराष्ट्र राज्य गृहमंत्री यांच्याकडे दलित पॅंथरचे उपाध्यक्ष विश्वास मोरे यांची निवेदनाद्वारे तक्रार

 पुसेगाव - महिलेस मोबाईल वरून लज्जास्पद  बोलणे व अश्लील भाषा वापरून अपमानित केल्या संदर्भात कोरेगाव पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार  महिलेची फिर्याद दाखल करून घेण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने तसेच केवळ धमकीची फिर्याद नोंद करण्यात आली असल्याचे महिला मीनाक्षी उकेश काळे यांच्या समवेत पश्चिम महाराष्ट्र दलित पॅंथर उपाध्यक्ष विश्वास मोरे यांनी निवेदनाद्वारे पोलीस उपविभागीय अधिकारी कोरेगाव व महाराष्ट्र गृहराज्यमंत्र्याकडे तक्रार निवेदनाद्वारे केली आहे.
.  पश्चिम महाराष्ट्राचे दलित पॅंथर चे उपाध्यक्ष विश्वास मोरे यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पारधी समाजातील  महिलेची मुलगी दिनांक 8/ 9/ 2022 रोजी बारामती येथून मुलीचे आत्या तिच्याबरोबर बारामतीला गेले असता त्या ठिकाणावरून त्या रात्री सदर  मुलगी गायब झाली असून, तिच्या घरातील व्यक्तींनी शोध घेऊनही सापडली नाही. नंतर परभणी येथील नाव माहित नाही तो इसम व गायब मुलगी यांचे फेसबुक वर प्रेम जुळले निदर्शनास आल्यावर,परभणी येथील राजेश्री हिची सख्खी आत्या हिच्या मोबाईलवर,वरील मोबाईल वरून धमकी वजा लज्जास्पद बोलणे, मुलीच्या बाबतीत अश्लील फोटो पाठवणे बाबत, तसेच गलिच्छ व शिवीगाळ भाषेमध्ये बोलणे तसेच तुला व तुझ्या नेत्यांना माझे काय करायचं असेल ते करून घेणे असे अर्वाच्य भाषेमध्ये उरमट उत्तरे देत आहे. तरी सदर बेपत्ता मुलगी ही फेसबुक इसमा बरोबर पळून गेलेली असून फेसबुक वाला तो इसम तिच्या आत्याला शिवीगाळ करून लज्जास्पद बोलत आहे. रेवडी तालुका कोरेगाव येथे असताना हा फोन वारंवार येत असल्याने या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे.  रेवडी  येथील या फोनच्या आलेल्या बोलण्यानुसार सदर महीला ही स्वतः तिच्या नातेवाईकासह कोरेगाव पोलीस स्टेशन येथे या मोबाईलवर लज्जास्पद बोलणे,याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता कोरेगाव पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार यांचेकडून फक्त दमदाठीची फिर्याद दाखल केल्याचे म्हटले असून, गलिच्छ शब्दांचा वापर त्या फिर्यादीमध्ये केला नसल्याचे, नमूद केले आहे. महिलेने सांगितल्याप्रमाणे गुन्हा नोंद न करून घेतल्या संदर्भामध्ये स्वतः दलित पॅंथरचे विश्वास मोरे यांनी कोरेगाव पोलीस निरीक्षक सावंत साहेब यांच्याशी चर्चा केली असल्याचे म्हटले असून ही मोबाईल वरून अश्लील व लज्जास्पद भाषेत बोलणे ही गोष्ट साधीसुधी नसून मेहरबान यांनी स्वतः जातीने लक्ष दिले पाहिजे, आणि ज्या पद्धतीने पाहिजे तसा गुन्हा नोंद करत नाही म्हणून दलित पॅंथर चा महाराष्ट्र उपाध्यक्ष या नात्याने मी या महिलेच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असून परभणीच्या इसमावर सायबर क्राईम गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त