राज्यातील गडकोट किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांवर कायम स्वरुपी भगवा झेंडा उभारावा

भाजप शहराध्यक्ष विकास गोसावी; भारतीय जनता पार्टी करणार पाठपुरावा

सातारा : महाराष्ट्रातील गडकोट किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांवर कायम स्वरुपी भगवा झेंडा उभारावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमारभाऊ गोरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा झेंडा घेऊन स्वराज्य स्थापन केले आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी ते वाढवलं , आणि त्यानंतरच्या काळात मावळ्यांनी अटकेपार भगवा झेंडा फडकवला, असे असताना सुद्धा महाराष्ट्रातील किल्ल्यांवर आणि ऐतिहासिक स्थळांवर भगवा झेंडा दिसत नाही. काही दिवसांपूर्वी आलेल्या एका व्हिडिओमध्ये अत्यंत वाईट गोष्ट दिसत आहे महाराष्ट्र मध्येच असलेल्या जंजिरा किल्ल्यावर आणि परिसरात भगवा झेंडा नेण्यासाठी आणि फडकवण्यासाठी मनाई केली जात आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्रातील एखाद्या किल्ल्यावर किंवा ऐतिहासिक स्थळावर भगवा झेंडा देऊ नये किंवा फडकवू नये यासाठी अटकाव केला जात असेल तर ही गोष्ट कधीही सहन केली जाणार नाही. महाराष्ट्र शासनाचा तर्फे महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांवर आणि ऐतिहासिक स्थळांवर सुद्धा कायमस्वरूपी भगवा झेंडा फडकवण्याची व्यवस्था करण्यात यावी आणि त्याची निगा राखण्यासाठी शासकीय यंत्रणा उभारावी, त्याचप्रमाणे प्रत्येक किल्ल्यांवर आणि ऐतिहासिक स्थळांवर, त्या किल्ल्याचे त्या स्थळाचे नाव लांबून दिसेल इतके मोठे उभारण्यात यावी अशी मागणी करण्यात आली, या निवेदनाची प्रत माहिती आणि कार्यवाहीसाठी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. यावेळी भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, भाजपा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, सातारा शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, नितीन कदम, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम बोराटे आणि पदाधिकारी उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त