माण खटावमधील प्रभाकर देशमुख, घार्गेंसह राष्ट्रवादी झाली दुबळी

दहिवडी : सातारा जिल्हा कधीकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. पुण्यापेक्षा सातारा जिल्ह्याने शरद पवारांवर जीवापाड प्रेम केले होते. सर्वच्या सर्व आमदार आणि खासदार राष्ट्रवादीचेच निवडून जायचे. भाजप आणि शिवसेनेला भोपळा फोडणेही कठीण व्हायचे. परंतु साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, तत्कालीन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माण खटावचे तत्कालीन आमदार जयकुमार गोरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला राम राम करत भाजपचे कमळ हाती घेतले. तिथेच पहिला धक्का राष्ट्रवादीला बसला आणि राष्ट्रवादीमय समजला जाणारा सातारा जिल्हा भाजपमय झाला.

 त्यानंतर 2019 ला जयकुमार गोरे, शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपमधून आमदार झाले. नंतर पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण केल्यानंतर 2024 ची विधानसभा लागली आणि दरम्यान झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने चढता आलेख पूर्ण केला होता. 

यामुळे भाजप कार्यकर्त्यांची धाकधूकही वाढली होती, परंतु कसल्याही परिस्थितीत राज्यात महायुतीची सत्ता आणायचीच असा चंग बांधलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी राज्यात सत्ता आणून दाखवली आणि सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचा सुपडा साफ केला.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासारख्या मातब्बरांना पहिल्याच प्रयत्नात भाजपच्या शिलेदारांनी धूळ चारली. 

माण खटावही वेगळा नव्हता. जयकुमार गोरे यांना अडवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते संधीच शोधत असायचे. 2024 ला प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, अभय जगताप, रणजितसिंह देशमुख यांच्यासारख्या गोरे विरोधकांनी जयकुमार गोरे यांचा कसल्याही परिस्थिती पराभव करायचाच यासाठी आपले पाय जमिनी रोवले होते. परंतुपरफेक्ट नियोजन करत जयकुमार गोरे यांनी हॅट्रीक साधली आणि तीही 50 हजारांच्या फरकांनी आणि एरवी विधानभवन गाठणारे जयकुमार गोरे मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर पोचले. जयकुमार गोरेंवर टीका करणाऱ्या विरोधकांना पहिलीचा चपराक बसली आणि तेव्हापासून जनतेच्या प्रश्नाची जाण असणारे नेते मतदारसंघातून गायबच झाले. 

महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे अभिवचन देणारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते आणि नेते दिसेनासे झालेत. 2019 ला अपक्ष निवडणूक लढवलेले प्रभाकर देशमुख, 2024 ला तुतारीकडून लढलेले प्रभाकर घार्गे निकाल लागल्यापासून मतदारसंघात दिसलेच नाहीत. विरोधी पक्ष सक्षम असावा असे बोलले जाते परंतु माण खटाव मतदारसंघातील विरोधकाची भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दुबळी झाल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगू लागली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त