मोतीबिंदूच्या रुग्णांना दिली नवीदृष्टी मनोजदादा युवा मंचचे कार्य उल्लेखनीय डॉ. परवेज

देशमुखनगर : कराड उत्तर भारतीय जनता पार्टीचे नेते मा.मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून घेण्यात येत असलेल्या मोतीबिंदू व नेत्रचिकित्सा शिबिरास प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रसाद मिळत असून मनोजदादा युवा मंच हे प्रामाणिक कार्य करत आहेत.त्यांचे कार्य निश्चितच वाखाण्याजोगे आहे. समाजातील गरजू लोकांना दृष्टी देण्याचं काम हे युवा मंच करत आहे. आज पर्यंत युवा मंचच्या माध्यमातून जवळपास 10000 पेक्षा जास्त लोकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करून त्यांना नव्याने जग पाहण्याची संधी उपलब्ध यांनी करून दिली आहे. आत्ता झालेल्या वाढदिवसाचे शिबीर 7 ठिकाणी घेण्यात आले. यामध्ये 10000 पेक्षा जास्त रुग्णनची तपसनी करण्यात आली. त्यामध्ये 2000 लोकांचे मोतीबिंदू ऑपेरेशन करण्यात येणार आहेत.8000 लोकांना मोफत चेष्मे वाटप करण्यात आले.त्यांच्या कार्याची दखल निश्चितच घेण्यासारखी आहे.
   आम्ही एच व्ही देसाई हॉस्पिटल पुणे यांच्या कार्याचे कौतुक करत असून त्यांच्या येणाऱ्या भविष्यकाळामध्ये त्यांना लागेल तेवढी मदत करण्याचे आज आम्ही आश्वासन देत आहे.असे प्रतिपादन एच. व्ही.देसाई हॉस्पिटल चे डायरेक्टर  डॉ. परवेश बिजोरिया यांनी केले.
  मा. विक्रम घोरपडे डायरेक्टर खटाव मान साखर कारखाना यांनी एच व्ही देसाई हॉस्पिटल पुणे येथे सदिच्छा भेट दिली यावेळी ते बोलत होते याप्रसंगी  गणेश जाधव, प्रशांत कणसे, सुधीर शेळके,  उदय काळे,  प्रवीण नावडकर, जितेश खरात, संजय कुलकर्णी, वैष्णवी कदम, लक्ष्मण देसाई, रोहित काटे, आदी मान्यवर उपस्थित होते

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला