पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
अजित जगताप- Fri 10th Jul 2026 09:29 pm
- बातमी शेयर करा
सातारा : आळंदी ते पंढरपूर ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. बुधवार दिनांक १५ जुलै रोजी दुपारी दोन वाजता सातारा जिल्ह्यात चार दिवसासाठी पालखी सोहळ्याचा मुक्काम आहे . या पालखीच्या स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषदेने संपूर्ण जय्यत तयारी केली आहे. एकाही वारकऱ्यांना त्रास होऊ नये. अशी सुविधा सातारा जिल्हा परिषद मार्फत करण्यात आली आहे. अशी माहिती सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर प्रियाताई शिंदे यांनी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या वेळेला सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी यशानी नागराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, सातारा पंचायत समितीचे सभापती महेश गाडे, जिल्हा परिषद सदस्य अजित साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यामध्ये लोणंद व फलटण या शहरांमध्ये त्यानंतर तरडगाव व बरड या ग्रामीण भागामध्ये पालखी सोहळ्याचे सुसज्ज नियोजन करण्यात आलेले आहे. प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर एक रुग्णवाहिका तसेच ५८६ वारकरी दिंडीसाठी मेडिसिन किट, ऑक्सिजन पुरवठा आणि सात ठिकाणी सुविधा केंद्र उभी करण्यात आलेले आहे . पाच हजार वारकरी एका ठिकाणी थांबू शकतात. अशी सुविधा आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळेला प्रकाशझोत तसेच ओ.पी.डी. साठी बेड, पाणी टँकर आणि नर्सिंग कॉलेजच्या ८०० विद्यार्थिनी व विद्यार्थी वारकऱ्यांच्या सेवेसाठी थांबणार आहेत.
भाविक व श्रद्धाळू यांच्या भक्तीमय वातावरणामध्ये त्यांना पायी दिंडीमध्ये कोणत्याही त्रास होऊ नये. यासाठी शुद्ध पाणी तसेच सातारा जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागातील कर्मचारी व अधिकारी प्रयत्न करत आहेत. सातारा जिल्ह्यातील सन्माननीय मंत्री, आमदार, जिल्हा परिषद सभापती, पंचायत समिती सभापती, उपसभापती तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांच्या समवेत आरोग्य शिक्षण व बांधकाम समाज कल्याण विभागातील सर्व जण परिश्रम घेत आहेत.
सातारा जिल्ह्यात चार दिवस पालखीचा मुक्काम असल्यामुळे वारीच्या पालखीच्या दर्शनासाठी स्थानिक पातळीवर नगरपंचायत आणि ग्रामपंचायत तसेच पंचायत समितीने ही नियोजन केलेले आहे. त्याचीही देखरेख जिल्हा परिषदेमार्फत होत आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्व विषय मंजूर करण्यात आलेले आहेत. सातारा शहरातील पशुसंवर्धन दवाखान्याची जागा ही नगरपालिकेला हस्तांतरित करण्यात आलेली आहे. सातारा शहरातील वाढत्या नागरिकीकरण व वाहनांची संख्या लक्षात घेता या ठिकाणी वाहन तळे होणे अपेक्षित आहे. शासनाच्या निर्णयानुसार शासनाची जागा व लोकल बोर्डाची इमारत ही नगरपालिकेला हस्तांतरित केलेले आहे. या ठिकाणी असणाऱ्या पशुसंवर्धन दवाखान्यात येणाऱ्या पशुधनच्या ही काळजी घेण्यात आली असून त्यासाठी कोडोली येथील११ गावच्या पशुधनासाठी सातारा नगरपालिकेने एक कोटी बारा लाख निधी जिल्हा परिषदेला वर्ग केलेले आहे. एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांबद्दल आलेल्या निवेदनाचा सहानभूतीपूर्वक विचार करून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याला निलंबन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. असे ही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले. बुधवार दिनांक १५ जुलै रोजी दुपारी दोन वाजता नीरा पाडेगाव या ठिकाणी पालखीचे आगमन सातारा जिल्ह्याचे हद्दीत होणार आहे. या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषदेतील सर्व पदाधिकारी- सदस्य त्याचबरोबर प्रत्येक खाते प्रमुख आणि मंत्री- आमदार, सभापती तसेच वारकऱ्यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे.
या सोहळ्यामध्ये कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. सर्व प्रकारच्या नियोजन गृहीत धरून यावेळी पालखीच्या सोहळ्यासाठी सुविधा देण्यास जिल्हा परिषद कटीबद्ध असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार उपस्थित होते. सातारा जिल्हा परिषदेच्या सभागृहात प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाला प्रवेश दिला असला तरी सदरच्या वृत्त प्रसिद्ध करण्यासाठी प्राधान्य द्यावे. असे काहींनी सूचित केले आहे.

---------------------------------------------
फोटो सातारा जिल्हा परिषद येथील पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना अध्यक्ष डॉक्टर शिंदे उपाध्यक्ष राजू भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नागराजन व अभ्यासू पत्रकार (छाया- निनाद जगताप सातारा)
#satarazp#bjp#priyashinde#rajubhosle
स्थानिक बातम्या
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Fri 10th Jul 2026 09:29 pm
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Fri 10th Jul 2026 09:29 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Fri 10th Jul 2026 09:29 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Fri 10th Jul 2026 09:29 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Fri 10th Jul 2026 09:29 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Fri 10th Jul 2026 09:29 pm
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Fri 10th Jul 2026 09:29 pm
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Fri 10th Jul 2026 09:29 pm
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Fri 10th Jul 2026 09:29 pm
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Fri 10th Jul 2026 09:29 pm
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Fri 10th Jul 2026 09:29 pm
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Fri 10th Jul 2026 09:29 pm
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Fri 10th Jul 2026 09:29 pm












