विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
Kiran Shinde
- Thu 16th Jul 2026 08:06 am
- बातमी शेयर करा
सातारा : विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने पंढरीकडे धावणाऱ्या वारकऱ्यांच्या थकलेल्या चरणांची सेवा आणि त्या माध्यमातून पुढे चालण्यास बळ देणारा चरण सेवा उपक्रम हजारो वारकऱ्यांचा थकवा दूर करून त्यांचे आशीर्वाद घेत आहे.
आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा आणि चरणसेवेचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील 'चरणसेवा' उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे.
यामध्ये महालक्ष्मी नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कॉलेज रायगावचे विशेष योगदान होते. या वर्षीही सेवा केंद्रांवर डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक कार्यरत असून, औषधी आयुर्वेदिक तेल, रुग्णवाहिका यासह सेवा करण्यात येत आहे.
महालक्ष्मी कॉलेज ऑफ नॅचरोपॅथी & योगिक सायन्सेस रायगाव शिबीर
आज जर्मन टेन्ट, तरडगाव रोड, बाळूपाटलाची वाडी येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातर्फे चरणसेवा उपक्रमात महालक्ष्मी नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कॉलेज रायगावच्या विद्यार्थ्यांनी १५७५ वारकऱ्यांना, आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी १४७० वारकऱ्यांच्या, संजीवन नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी १५५० वारकऱ्यांच्या, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय साताराच्या विद्यार्थ्यांनी ४४० वारकऱ्यांना पायाला तेल लावून मसाज करत चरण सेवा दिली. तर २२८ वारकऱ्यांचे ड्रेसिंग केले. यशवंत आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ७६० वारकऱ्यांना चरण सेवा दिली. बाह्य रुग्ण विभागाने ३६० वारकऱ्यांची तपासणी केली व औषधोपचार केले.
जिज्ञासा आणि आखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी
१६८० चरण सेवा दिली. बाह्य रुग्ण विभागाने ३८० वारकऱ्यांवर औषध उपचार केले. जीपी असोसिएशन सातारा
यांच्याकडून जनता अर्बन बँक येथे मोफत उपचार शिबिर आयोजित करण्यात आले यात ५२० रुग्णांनी लाभ घेतला. आज दिवसभरात ७४७५ वारकऱ्यांची चरण सेवा करण्यात आली.
बाह्य रुग्ण विभागा मार्फत १२६० वारकऱ्यांची तपासणी करण्यात आली. २८० वारकऱ्यांना ड्रेसिंग करण्यात आले. यामध्ये २१५ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. मुख्यमंत्री सहायता कक्षामार्फत राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचा वारकऱ्यांना लाभ होत असून त्यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे अशी माहिती या कक्षाचे समन्वयक डॉ. रविराज निकम यांनी दिली.
स्थानिक बातम्या
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Thu 16th Jul 2026 08:06 am
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Thu 16th Jul 2026 08:06 am
शिंदे साहेब, जावळी-महाबळेश्वरची हाक ऐका!
- Thu 16th Jul 2026 08:06 am
“सात संचालक ‘ताब्यात’… तरी ठराव धुळीस! हुमगावात मानकुमरेंचा हल्लाबोल
- Thu 16th Jul 2026 08:06 am
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Thu 16th Jul 2026 08:06 am
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Thu 16th Jul 2026 08:06 am
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Thu 16th Jul 2026 08:06 am
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Thu 16th Jul 2026 08:06 am
-
फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
- Thu 16th Jul 2026 08:06 am











