पाटण : पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट च्या युवा अध्यक्षपदी मल्हारपेठ येथील रोहित कारंडे यांची निवड करण्यात आली. सातारा येथे अजित पवार गटाच्या झालेल्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष सन्माननीय संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील काका, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे ,कार्याध्यक्ष अमित कदम, शिक्षण सभापती संजय देसाई,प्रदीप विधाते ,दत्तानाना ढमाळ ,उपस्थित होते रोहित कारंडे यांचा सत्कार केला.कारंडे म्हणाले पाटण तालुक्यातील राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाच्या युवा अध्यक्षपदी निवड केली आहे. पक्ष नेतृत्वाने टाकलेला विश्वासात पात्र राहून पक्ष संघटक वाढीसाठी प्रयत्न करणार आहे.जुन्या आणि नवीन कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षाच्या आदेशानुसार काम करणार आहे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर ,आमदार मकरंद पाटील ,आमदार दीपक चव्हाण, यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे असे निवडी नंतर बोलताना रोहित कारंडे यांनी सांगितले.