कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.
कट्टर कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश.राजेंद्र बोंद्रे.
- Tue 24th Dec 2024 02:12 pm
- बातमी शेयर करा
फलटण: मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत श्री गणेश दिनकर शिंदे कोळकी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य यांनी राजे गटाचा त्याग करून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या अगोदर कोळकी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य उदयसिंह निंबाळकर उर्फ बबलू भैया यांनी त्यांच्याच विचाराचे राजे गटाचे कार्यकर्ते राजन खिलारे आणि इतर कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला होता त्यानंतर लगेचच आता कोळकी गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गणेश दिनकर शिंदे यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला आहे. गणेश शिंदे हे राजे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते पण आम्हाला आणि स्थानिक पातळीवरील लोकांना सत्ताधारी हे विश्वासात घेत नाहीत आणि त्यामुळे स्थानिक पातळीवरील जनतेची कामे करता येत नाहीत यामुळे आम्ही कंटाळून राजे गटाला सोडून भाजपामध्ये प्रवेश करत आहोत.
कारण यापुढे आमच्या कोळकी गावाच्या विकासासाठी आणि फलटण तालुक्याच्या विकासासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच खंबीर नेतृत्व योग्य आहे असा आमचा विश्वास आहे त्यामुळे कोळकी गावा तील जनतेच्या समस्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार प्रयत्न करणार आहोत त्यामुळे आम्ही जाहीर भाजपमध्ये प्रवेश केला आहे असे सांगितले. कोळकी ग्रामपंचायत मध्ये विद्यमान सरपंच असं एकूण 17 सदस्य आहेत यापैकी हे दोन सदस्य माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या भाजपामध्ये आलेले आहेत.
यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, फलटण तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष भाजपा रणजीत जाधव, ग्रामपंचायत सदस्य उदयसिंह निंबाळकर उर्फ बबलू भैया , राजन खिलारे ,निरंजन निंबाळकर ,यशवंत जाधव ,गोरख जाधव ,डॉक्टर प्रमोद अब्दागिरे, अँड. सुरज क्षी रसागर, तसेच कोळकीतील बहुसंख्य ग्रामस्थ आणि भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
#phaltan
स्थानिक बातम्या
सराईत घरफोड्या चोरट्याच्या टोळीचा पर्दाफाश; 27.65 लाखांचा मुद्देमाल जप्त
- Tue 24th Dec 2024 02:12 pm
सातारा न्यूजचा दणका, अन्न व औषध प्रशासनाकडून फलटणमध्ये मोठी कारवाई
- Tue 24th Dec 2024 02:12 pm
कॉपर वायर व ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी टोळी गजाआड; 26 गुन्ह्यांची उकल, 20.22 लाखांचा मुद्देमाल जप्त.
- Tue 24th Dec 2024 02:12 pm
साताऱ्यात देशी पिस्टलसह संशयित जेरबंद; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
- Tue 24th Dec 2024 02:12 pm
सातारा जिल्ह्यातील शिवसेनेत शीतयुद्ध; लाभार्थ्यांची टोळी विरुद्ध निष्ठावंत - रणजितसिंह भोसले
- Tue 24th Dec 2024 02:12 pm
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Tue 24th Dec 2024 02:12 pm
संबंधित बातम्या
-
माजी उपसभापती चंद्रकांत कदम (पाटील) यांचे निधन.
- Tue 24th Dec 2024 02:12 pm
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Tue 24th Dec 2024 02:12 pm
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Tue 24th Dec 2024 02:12 pm
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Tue 24th Dec 2024 02:12 pm
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Tue 24th Dec 2024 02:12 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Tue 24th Dec 2024 02:12 pm













