'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार
Satara News Team
- Mon 23rd Dec 2024 03:31 pm
- बातमी शेयर करा

सातारा: दिनांक 23 डिसेंबर करंजे पेठ, सातारा येथील 'शिक्षण प्रसारक संस्था' संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल व आदर्श विद्यामंदिर मधील विद्यार्थ्यांनी सोमवार दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी आठवडी बाजार हा उपक्रम राबवला. आठवडी बाजाराचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष श्री नंदकिशोर जगताप संस्थेचे कार्यक्षम सचिव श्री तुषार पाटील व चेअर पर्सन सौ प्रतिभा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामस्थ व पालकांनी बाजारात खरेदी करून मुलांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहार समजावेत, शिक्षण आणि व्यवहार यांची सांगड घालावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संस्था सचिव श्री तुषार पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आठवडा बाजाराचे नियोजन केले होते.
त्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, विविध प्रकारची कडधान्य व फळे विक्रीसाठी ठेवले होते. येथे खरेदी करण्यासाठी गावातील नागरिकांनी गर्दी केली होती. या उपक्रमाचे व विक्री करणाऱ्या विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांनी व संस्थाचालकांनी कौतुक केले.
उपक्रमास शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष श्री नंदकिशोर जगताप, सचिव श्री तुषार पाटील, चेअर पर्सन सौ प्रतिभा चव्हाण, इतर सर्व संचालक, श्रीपतराव पाटील हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री अमरसिंग वसावे, आदर्श विद्या मंदिर च्या मुख्याध्यापिका सौ जाधव, सर्व शिक्षक, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
#school
#satara
स्थानिक बातम्या
कारागृहातून सुटलेल्या संशयिताला नेताना जमावाची गुंडागर्दी
- Mon 23rd Dec 2024 03:31 pm
अवैध गुटखा विकणारांवर छापासत्र उंब्रज पोलीस, अन्न, औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई
- Mon 23rd Dec 2024 03:31 pm
संजीवराजेंच्या घरी आयकर विभागाचे पथक; चौकशी चालू
- Mon 23rd Dec 2024 03:31 pm
ऑनलाईन गेम मध्ये पैसे हरल्याने मोटर सायकल चोरी करणारा वडूज पोलीसांकडून जेरबंद.
- Mon 23rd Dec 2024 03:31 pm
"असे" पालकमंत्री मिळणे सातारा जिल्ह्यासाठी दुर्दैवी..
- Mon 23rd Dec 2024 03:31 pm
समाजातील लोकांनी दातृत्वाची भावना ठेवायला हवी : दत्तात्रेय इंगवले
- Mon 23rd Dec 2024 03:31 pm
संबंधित बातम्या
-
पुसेगाव येथे रस्त्याच्या कामासाठी कडकडीत बंद
- Mon 23rd Dec 2024 03:31 pm
-
वी केअर फाउंडेशनच्या वतीने जि.प. शाळा ठक्करनगर (नागेवाडी) येथे शालेय वस्तूंचे वाटप
- Mon 23rd Dec 2024 03:31 pm
-
सातारा न्युजचा दणका ! पाचगणीतील बंद इटॅाईलेट सुरु होणार , मुख्याअधिकारी निखील जाधव यांचा लेखी खुलासा
- Mon 23rd Dec 2024 03:31 pm
-
तारळी प्रकल्पग्रस्त मारुती जाधव यांचा प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा
- Mon 23rd Dec 2024 03:31 pm
-
भाजपा सदस्यता नोंदणीत सहभागी व्हावे – सौरभबाबा शिंदे
- Mon 23rd Dec 2024 03:31 pm
-
केसांबरोबर खिशाला ही लागणार कात्री
- Mon 23rd Dec 2024 03:31 pm
-
करंजे येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा
- Mon 23rd Dec 2024 03:31 pm