फलटण येथे श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शनाचे दिनांक 2 ते 6 जानेवारी 2025 आयोजन...श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

फलटण :  फलटण येथील श्रीमंत संजीव राजे उद्यान महाविद्यालय व कृषी महाविद्यालय फलटण यांच्यावतीने शेती शाळा जिंती नाका येथे दिनांक 2 जानेवारी ते दिनांक6 जानेवारी 2025 पर्यंत भव्य असे श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025 चे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली यावेळी श्रीमंत संजीव राजे यांचे बरोबर जेष्ठ प्राचार्य अरविंद निकम प्राचार्य एस डी निंबाळकर व प्राचार्य यू.डी .चव्हाण उपस्थित होते.


 या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य असे आहे की या कृषी प्रदर्शनात कृषी क्षेत्राशी नामांकित अशा निगडित कंपन्यांचा 200 पेक्षा अधिक कंपन्यांचा सहभाग सहभाग असून यामध्ये शेतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या माहितीसाठी आवश्यक असे जैविक तंत्रज्ञान कृषी उत्पन्न व अर्थसहाय्य कृषी उपयोगी पुस्तके कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (ए आय) यांची माहिती आणि तंत्रज्ञान प्रदर्शन तसेच ट्रॅक्टर कंपन्या शेतीची अवजारे सेंद्रिय शेती पशुधन पशुसंवर्धन व संगोपन डेअरी पोल्ट्री पॉलिहाऊस ठिबक सिंचन स्प्रिंकलर सिंचन पीव्हीसी पाईप कृषी पंप, अशा प्रकारच्या विविध माहितीचे दालन या प्रदर्शनात उपलब्ध असणार आहेत . 

महत्वाचे म्हणजे भविष्यातील शेती कृत्रिम बुद्धीमत्ता (ए आय टेक्नॉलॉजी) डॉ. विवेक कृषी विज्ञान केंद्र बारामती. डॉ. प्रियदर्शनी देशमुख कृषी विज्ञान केंद्र कालवडे. कृषी उद्योजकता विकास डॉ. यु डी चव्हाण प्राचार्य कृषी महाविद्यालय फलटण, शाश्वत दुग्ध व्यवसाय डॉ. शांताराम गायकवाड गोविंद मिल्क फौंडेशन फलटण. अशा मान्यवरांचे शेतकऱ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन चा कार्यक्रम आयोजित केला आहे अशा विविध प्रकारच् ज्ञान, शेतकऱ्यांना आपली शेती व्यवसाय संपन्न करण्याचा आवश्यक असा उपक्रम आणि बहुमूल्य माहिती या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना मिळणार आहे. 

 तसेच पुढील वर्षीच्या उपक्रमात प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना विविध पिके आणि फळभाज्या पहावयास मिळणार असून दिनांक दोन ते सहा जानेवारी 2025 रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत या कृषी प्रदर्शनाकरता मोफत प्रवेश आहे या प्रदर्शनात स्टॉल उपलब्ध असून बुकिंग साठी 7564909091आणि 9096355541 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे या कृषी प्रदर्शनाचे मॅनेजमेंट ्स पुणे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त