सातारा न्यूज राशिभविष्य आज २७/६/२०२५ शुक्रवार
Satara News Team
- Fri 27th Jun 2025 09:31 am
- बातमी शेयर करा
|| श्री स्वामी समर्थ ||
मेष - पार्टनरशीपमध्ये फायदा
आज तुमचा संपूर्ण दिवस कामात व्यस्त असेल. तुम्हाला पैशांची व्यवस्था करावी लागेल. डील फायनल करण्यात व्यस्त असाल. व्यस्त वेळापत्रकामुळे कुटुंबासाठी वेळ काढता येणार नाही. आई तुमच्यावर नाराज राहू शकते. पार्टनरशीपमध्ये फायदा होईल. कोणाशीही वाद टाळण्याचा प्रयत्न करा. आज भाग्य ८५ टक्के तुमच्या बाजूने असेल. गणपतीला लाडूचा नैवेद्य अर्पण करा.
वृषभ - बोलण्यात गोडवा ठेवा.
आज ऑफिसमध्ये नोकरदार लोकांकडून सूचनांचे पालन केले जाईल. मित्रांसोबत फिरायला जाण्याचा विचार कराल. जोडीदाराचा सल्ला तुमच्यासाठी उपुयक्त ठरेल. बोलण्यात गोडवा ठेवा. लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांच्या आयुष्यात गोडवा येईल. आज भाग्य ६१ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी लक्ष्मीला खीर अर्पण करा.
मिथुन - सुखसोयींवर पैसे खर्च कराल.
आज तुम्हाला खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. भविष्यात आर्थिक संकटांचा सामना करावा लागेल. सुखसोयींवर पैसे खर्च कराल. सामाजिक कार्यक्रमात उत्साहाने सहभागी व्हाल. मालमत्ता खरेदीसाठी दिवस चांगला राहिल. मुलांच्या भवितव्याबद्दल काळजी वाटेल. गुंतवणुकीतून फायदा होईल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. आज भाग्य ९८ टक्के तुमच्या बाजूने राहिल. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या
कर्क - घाईत निर्णय घेऊ नका.
आज मुलांच्या समस्या वडिलांच्या मदतीने सुटतील. विद्यार्थी कोणत्याही स्पर्धेत सहभागी होतील. आरोग्य बिघडू शकते. व्यवसायात घाईने निर्णय घेणे टाळा. भविष्यात अडचणी निर्माण होतील. पैसे उधार दिले असतील तर परत मिळतील. आज भाग्य ६६ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी लक्ष्मीची पूजा करा.
सिंह - वडीलांचा सल्ला घ्या
कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मैत्री होईल. आवडीचे काम मिळाल्याने आनंदी असाल. वैवाहिक जीवनात गोडवा राहिल. लव्ह लाईफ जगणाऱ्यां लोकांना बोलण्यावर नियंत्रण ठेवा. वडिलांच्या सल्ल्याची आवश्यकता भासेल. व्यवसायासाठी काही योजना आखाल. आज भाग्य ९४ टक्के तुमच्या बाजूने असेल. पिवळी वस्तू दान करा.
कन्या - नफा मिळेल
आजचा दिवस तुमच्यात एक नवीन ऊर्जा निर्माण करेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात दिवसभर नफ्याच्या संधी मिळतील. मित्रांसोबत वेळ घालवाल. नोकरदार लोकांचा अधिकाऱ्यांशी सुरु असलेला वाद संपेल. काही लोकांना भेटाल. मुलांची प्रगती पाहून मन प्रसन्न होईल. आज भाग्य ७७ टक्के तुमच्या बाजूने असेल. विष्णूसहस्त्रनामाचे पठण करा.
तूळ - वैवाहिक जीवनात अडचणी
आजचा दिवस तुम्ही व्यस्त असाल. दैनंदिन कामात निष्काळजीपणा दाखवू नका. नवीन लोकांशी संपर्क साधल्यास व्यवसायात फायदा होईल. संध्याकाळी घरी पाहुणे येतील. वैवाहिक जीवनात काही अडचणी असतील तर त्या संपतील. आज भाग्य ८९ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी सरस्वतीची पूजा करा.
वृश्चिक - कामात अडथळे येतील.
आज तुम्ही परिस्थितीला घाबरु नका, धैर्याने सामोरे जा. विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विकास होईल. राजकीय दिशेने काम करत असाल तर अधिकाऱ्याची मदत मिळू शकते. अचानक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतील. कामात अडथळे येतील. आज भाग्य ७१ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिव चालीसाचे पठण करा
धनु - कठोर परिश्रम करावे
लागतील आज करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. शत्रू अडथळे निर्माण करु शकतात. विवाहासाठी पात्र असणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल असेल. गुंतवणूक करणे टाळा, भविष्यात अडचणी येतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. आज भाग्य ६७ टक्के तुमच्या बाजूने असेल. योग प्राणायामचा अभ्यास करा
मकर - पार्टनरशीपमध्ये वाद होतील
आज तुम्ही आनंदी असाल. टीकाकारांकडे लक्ष देऊ नका. सामाजिक क्षेत्राशी संबंधित लोकांना सार्वजनिक समर्थन मिळेल. लोकांच्या भेटीतून फायदा होईल. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करत असाल तर वाद होईल. वडिलांच्या मदतीने अनेक कामे पूर्ण कराल. आज भाग्य ९६ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरजू लोकांना मदत करा.
कुंभ - वाद घालू नका
आज तुम्ही मित्रांसोबत लांबच्या प्रवासाला जाण्याची योजना बनवू शकता. सामाजिक क्षेत्राशी निगडित लोकांना सामाजिक सन्मान मिळेल. कोणतेही सरकारी काम प्रलंबित असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्याशी वाद घालू नका. तुमच्यासाठी हानिकारक ठरेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहिल. आज भाग्य ७८ टक्के तुमच्या बाजूने असेल. माशांना चपातीचे गोळे खाऊ घाला.
मीन - जोडीदारासोबत वेळ घालवाल
आज व्यवसाय करणाऱ्या लोकांना जास्त मेहनत घ्यावी लागेल. तुमच्या योजनांवर लक्ष केंद्रित कराल. अचानक तुम्हाला लाभ मिळू शकतो. एखाद्याकडून कर्ज घेतले असेल तर ते परत कराल. ज्यामुळे सुटकेचा नि:श्वास सोडाल. जोडीदारासोबत वेळ घालवाल.
आज भाग्य ९३ टक्के तुमच्या बाजूने असेल. हनुमानला शेंदूर अर्पण करा
सातारा न्यूज कोणत्याही अंधश्रद्धेला प्रोत्साहित करत नाही
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Fri 27th Jun 2025 09:31 am
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Fri 27th Jun 2025 09:31 am
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Fri 27th Jun 2025 09:31 am
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Fri 27th Jun 2025 09:31 am
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Fri 27th Jun 2025 09:31 am
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Fri 27th Jun 2025 09:31 am
-
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Fri 27th Jun 2025 09:31 am
-
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Fri 27th Jun 2025 09:31 am
-
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धिरेंद्रराजे खर्डेकर यांची राजकीय भेट
- Fri 27th Jun 2025 09:31 am
-
औंध महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विषयावर कार्यशाळा संपन्न.
- Fri 27th Jun 2025 09:31 am
-
फलटण येथील गणेश मूर्ती विटंबनेप्रकरणी संबंधितावर गुन्हा नोंद करा .
- Fri 27th Jun 2025 09:31 am









