शिक्षण प्रसारक संस्थेचे आधारवड संस्था सचिव तुषार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

सातारा : करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल मध्ये संस्थेचे विद्यमान सचिव तुषार पाटील व संचालक श्री चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.

 उद्योग भूषण या पुरस्काराने सन्मानित झालेले तुषार पाटील यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली संस्थेच्या माणिक कासट बालक मंदिर ,आदर्श विद्यामंदिर, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल व श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या चारही शाखांचे कामकाज उत्तम रित्या चालते. संस्थेमध्ये चालू असलेल्या विविध उपक्रमांचे सर्वेसर्वा असलेले तुषार पाटील यांना शिक्षण प्रसारक संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व संचालक व चारही शाखातील कर्मचाऱ्यांनी वाढदिवसानिमित्त उदंड व निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या व पुष्पगुच्छ देऊन सत्कार सन्मानही करण्यात आला त्यावेळी "सर्व उपक्रम यशस्वी पार पडण्यामागे सर्व कर्मचाऱ्यांनी केलेले प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे असतात" असे मत त्यांनी प्रांजळपणे व्यक्त केले. 

 संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व संस्थाचालक चारही शाखेचे मुख्याध्यापक, सर्व कर्मचारी वर्ग यांना धन्यवाद दिले. संचालक श्री चंद्रकांत पाटील यांनीही सर्वांचे आभार मानले. यावेळी शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा सौ वत्सला डुबल, उपाध्यक्ष जगन्नाथ किर्दत, नंदकिशोर जगताप, चेअर पर्सन सौ प्रतिभा चव्हाण, संचालिका सौ हेमकांची यादव ,सर्व संस्था चालक, मुख्याध्यापक श्री अमरसिंह वसावे, पर्यवेक्षक श्री यशवंत गायकवाड, मुख्याध्यापिका सौ नीलम शिंदे, सौ जाधव व संस्थेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त