हजारो भाविक व वारकऱ्यांच्या उपस्थिती सेवागिरी महाराज दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान
निसार शिकलगार - Sat 28th Jun 2025 11:32 am
- बातमी शेयर करा
पुसेगाव : टाळ-मृदंगाच्या तालावर भजनात दंग वारकऱ्यांची पाऊले.'ज्ञानोबा माऊली तुकाराम', 'श्री सेवागिरीं'चा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी.अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी तीर्थक्षेत्र पुसेगाव येथून प. पू. श्री सेवागिरी महाराजांच्या आषाढी वारी पायी पालखी दिंडीचे आज पंढरपूरकडे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. प्रस्थान सोहळा 'याचि देही याचि डोळा' अनुभवण्यासाठी पुसेगावात मोठ्या संख्येने वारकरी, भक्तगण, ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक दाखल झाले होते.
त्यामुळे, येरळाकाठ वैष्णवांच्या उपस्थितीनं गजबजून गेला होता. दिंडी प्रस्थानापूर्वी सेवागिरी मंदीरात मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांनी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व श्री सेवागिरी महाराजांच्या प्रतिमेचे तसेच श्री सेवागिरी महाराजांच्या पादुकांचे आणि पालखीचे मंत्रघोशात विधिवत पूजन केले. याप्रसंगी श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, गौरव जाधव, सचिन देशमुख, ट्रस्टचे माजी चेअरमन, विश्वस्त, सचिव यांच्यासह ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ,सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी व ग्रामस्थांची तसेच मंदिरात सुरू असलेल्या वारकरी गुरुकुल चे बाल वारकरी यांची उपस्थिती होती
दिंडीच्या अग्रभागी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशातील तसेच शाळांमधील मुला मुलींचे पारंपरिक वेशभूषेतील पथक, , वारकऱ्यांचे झेंडा पथक त्यामागे ज्ञानोबा-तुकोबा-सेवागिरींचा जयघोष करणारे पुरुष वारकरी, भजन गाणारे मंडळ, फुलांनी आकर्षक सजविलेल्या बैलगाडीच्या रथात श्री सेवागिरी महाराजांच्या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. डोक्यावर तुळस कलश घेतलेल्या महिला वारकरी दिंडीत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिंडीचे पहिले रिंगण झाले. त्यावेळी दोन जेसीबी आणि क्रेन मधून श्री सेवागिरी पालखी दिंडी वर जोरदार पुष्पवृष्टी करण्यात आली.
@pusegon
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Sat 28th Jun 2025 11:32 am
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Sat 28th Jun 2025 11:32 am
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Sat 28th Jun 2025 11:32 am
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Sat 28th Jun 2025 11:32 am
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Sat 28th Jun 2025 11:32 am
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Sat 28th Jun 2025 11:32 am
-
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Sat 28th Jun 2025 11:32 am
-
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Sat 28th Jun 2025 11:32 am
-
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धिरेंद्रराजे खर्डेकर यांची राजकीय भेट
- Sat 28th Jun 2025 11:32 am
-
औंध महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विषयावर कार्यशाळा संपन्न.
- Sat 28th Jun 2025 11:32 am
-
फलटण येथील गणेश मूर्ती विटंबनेप्रकरणी संबंधितावर गुन्हा नोंद करा .
- Sat 28th Jun 2025 11:32 am









