भरणे कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी खा.शरद पवार भरणेवाडीत; व्यक्त केली दु:ख..

 आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भरणे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्री गिरीजाबाई उर्फ जीजी विठोबा भरणे यांचे वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार  शरद पवार यांनी भरणेवाडी येथे दाखल होत भरणे  कुटुंबाचे सांत्वन केले

सातारा न्यूज पुणे : माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्री गिरीजाबाई उर्फ जीजी विठोबा भरणे यांचे वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले. त्यानंतर सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार  शरद पवार यांनी भरणेवाडी येथे दाखल होत भरणे  कुटुंबाचे सांत्वन केले. गिरीजाबाई उर्फ विठोबा भरणे यांच्या निधनाबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांसह भरणे कुटंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असताना देशाचे नेते शरद पवार यांनी भरणेवाडी निवासस्थानी भेट देऊन संपूर्ण भरणे कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी रामचंद्र भरणे, आबासाहेब भरणे, मधुकर भरणे आणि दत्तात्रय भरणे ही चारही भावंडं व भरणे परिवार उपस्थित होता.
भरणे कुटुंब हे शेतकरी  असल्याचे  सांगितले. गिरीजाबाई विठोबा भरणे यांवर मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. 

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला