सातारा न्यूज राशिभविष्य ३/६/२०२५ गुरुवार
Satara News Team
- Thu 3rd Jul 2025 10:33 am
- बातमी शेयर करा

|| श्री स्वामी समर्थ ||
मेष - समस्यांवर उपाय शोधाल.
आज तुम्हाला व्यवसाय वाढवण्यासाठी कठीण समस्यांवर उपाय शोधण्यात व्यस्त असाल. रोजगाराच्या दिशेने काम करत असाल तर तुम्हाला नवीन संधी मिळतील. चांगल्या भविष्यासाठी योजना आखाल. हरवलेले पैसे परत मिळतील. अनैतिक कामांपासून दूर राहा. आज भाग्य ८३ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरीबांना अन्नवस्त्र दान करा.
वृषभ - उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील.
आज तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत विकसित कराल. काही नवीन योजना राबवाल. भविष्यात तुम्हाला खूप फायदा होईल. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी व्हाल. नातेवाईकासाठ भेटवस्तू खरेदी करण्यासाठी जाऊ शकता. नवीन तांत्रिक माध्यमातून यश मिळेल. आज भाग्य ७७ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूच्या मंदिरात चण्याची डाळ आणि गूळ पिवळ्या कपड्यात बांधून अर्पण करा.
मिथुन - व्यवसायात फायदा
आज पार्टनरशीपमध्ये कोणताही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर दिवस चांगला जाईल. तुम्हाला लोकांना ओळखावे लागेल. तुमच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचू शकते. विकासाची योजना बनवाल. जुने कर्ज फेडण्यात यशस्वी व्हाल. नवीन व्यवसायात फायदा होईल. आज भाग्य ९० टक्के तुमच्या बाजूने असेल. श्री शिव चालीसाचे पठण करा.
कर्क - उद्धटपणे वागणे टाळा
आज तुम्हाला लांबच्या प्रवासाच्या संधी मिळतील. कुटुंबातील सदस्यांशी उद्धटपणे वागणे टाळा. तुमच्यावर नाराज होतील. वाढत्या खर्चासह उत्पन्नाचे काही स्त्रोत शोधावे लागतील. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. तुमच्या मनाला समाधान मिळेल. आज भाग्य ८८ टक्के तुमच्या बाजूने असेल. मुंग्यांना पीठ खाऊ घाला.
सिंह - अडचणी येतील
आज तुम्ही नवीन व्यवसाय सुरु कराल. भावंडांच्या सल्ल्याची आवश्यकता भासेल. राजकीय संबंधांचा फायदा होईल. विद्यार्थ्यांना अपूर्ण कामे पूर्ण करावी लागतील. अडचणींना सामोरे जावे लागेल. उधार दिलेले पैस सहज मिळतील. आज भाग्य ७८ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णुला बेसनाच्या लाडूचा प्रसाद अर्पण करा.
कन्या - वाद होतील
राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहिल. तुमच्याकडे महत्त्वाचे काम सोपवले जाईल. ते पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. तुम्ही स्वत:साठी वेळ काढण्याचा विचार कराल. ज्यामध्ये अपयशी ठराल. लव्ह लाईफमध्ये जगणाऱ्या लोकांनी स्वत:वर नियंत्रण ठेवावे. जोडीदाराशी वाद होतील. आज भाग्य ९९ टक्के तुमच्या बाजूने असेल. बजरंग बाणाचे पठण करा.
तूळ - फायदा होईल
आज शेअर मार्केट किंवा लॉटरीत पैसे गुंतवले तर भविष्यात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाला गती देण्यासाठी कोणाच्याही सल्ल्याचा विचार करु शकता. जोडीदारासोबत उभे राहाल. व्यवसायात आर्थिक लाभ होतील. आज भाग्य ८५ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूचे पूजन करा.
वृश्चिक - चिंता वाढेल.
आज परिस्थिती अनुकूल राहिल. एकाच वेळी अनेक कामे हाताळल्याने चिंता वाढेल. घाईमुळे तुमचे काम बिघडू शकते. काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. कुटुंबीयांसह काही शुभ कार्यात सहभागी व्हाल. आज भाग्य ७७ टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला गुळ खाऊ घाला.
धनु - बढती मिळेल
आज जोडीदारासोबत उर्वरित काम पूर्ण कराल. कुटुंबात काही काळ तणाव निर्माण होईल. तुम्ही त्याचे निराकरण करण्यात यशस्वी व्हाल. आई-वडिलांची सेवा करण्यात वेळ घालवाल. वरिष्ठांकडून कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळेल. बढती मिळू शकते. आज भाग्य ८१ टक्के तुमच्या बाजूने असेल. कपाळावर पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा.
मकर - सावध राहा
आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात सावधगिरी बाळगावी लागेल. कोणतीही रिस्क घ्यायची असेल तर विचारपूर्वक घ्या. तुम्हाला मानसिक शांती मिळेल. सामजिक संवाद वाढल्याने तुमची लोकप्रियता वाढेल. आज भाग्य ७८ टक्के तुमच्या बाजूने असेल. श्रीगणेश चालीसाचे पठण करा.
कुंभ - संकटात सापडाल
आज तुम्ही पैसे खर्च करण्यापूर्वी बचतीचा विचार कराल. भविष्यात मोठ्या संकटात सापडू शकता. कामाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस अनुकूल राहिल. सरकारी नोकरी संबंधित कोणतेही काम करण्याचा विचार करत असाल तर वेळ मिळेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आज भाग्य ९१ टक्के तुमच्या बाजूने असेल. गणपतीला दूर्वा अर्पण करा.
मीन - सन्मान वाढेल
आज तुम्ही तुमचे काम एखाद्या मित्राच्या मदतीने कराल. तुमचा मान-सन्मान वाढेल. कुटुंबासोबत भविष्याच्या योजनांवर विचार कराल. वैवाहिक जीवनात दीर्घकाळ येणारे अडथळे दूर होतील. सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल.
आज भाग्य ८० टक्के तुमच्या बाजूने असेल. सूर्याला जल अर्पण करा.
स्थानिक बातम्या
सातारा न्यूज राशिभविष्य ३/६/२०२५ गुरुवार
- Thu 3rd Jul 2025 10:33 am
सातारा न्यूज राशिभविष्य बुधवार दि.०२ जुलै २०२५
- Thu 3rd Jul 2025 10:33 am
शिक्षण प्रसारक संस्थेचे आधारवड संस्था सचिव तुषार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
- Thu 3rd Jul 2025 10:33 am
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार, दि. २८ जून २०२५
- Thu 3rd Jul 2025 10:33 am
सातारा न्यूज राशिभविष्य आज २७/६/२०२५ शुक्रवार
- Thu 3rd Jul 2025 10:33 am
'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेच्या सेटवर घडली मन हेलावून टाकणारी घटना
- Thu 3rd Jul 2025 10:33 am
संबंधित बातम्या
-
सातारा न्यूज राशिभविष्य बुधवार दि.०२ जुलै २०२५
- Thu 3rd Jul 2025 10:33 am
-
कराड येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या युवतीचा इमारतीवरून पडून मृत्यू
- Thu 3rd Jul 2025 10:33 am
-
हजारो भाविक व वारकऱ्यांच्या उपस्थिती सेवागिरी महाराज दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान
- Thu 3rd Jul 2025 10:33 am
-
शिक्षण प्रसारक संस्थेचे आधारवड संस्था सचिव तुषार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
- Thu 3rd Jul 2025 10:33 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार, दि. २८ जून २०२५
- Thu 3rd Jul 2025 10:33 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज २७/६/२०२५ शुक्रवार
- Thu 3rd Jul 2025 10:33 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज २६/६/२०२५ गुरुवार
- Thu 3rd Jul 2025 10:33 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज २५/६/२०२५ बुधवार
- Thu 3rd Jul 2025 10:33 am