फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.

फलटण. : फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री राजकुमार भुजबळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथक फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी पोलीस उपनिरीक्षक श्री दीपक पवार यांना आरोपींची माहिती देऊन छापा टाकण्याचे आदेश दिले होते. 

खात्रीशीर गोपनीय मिळालेल्या माहितीप्रमाणे श्री दीपक पवार यांनी गुन्हेगार सराईत असल्यामुळे नितीन चतुरे अमोल जगदाळे श्रीनाथ कदम हनुमंत दडस सुरज काकडे गणेश यादव विक्रम बनकर तुषार नलावडे व अमोल देशमुख अशा कर्तव्यदक्ष सहकाऱ्यांचे पथक तयार करून दुधेबावी आणि आजूबाजूच्या परिसरात आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी संशयीत आरोपी पल्सर मोटरसायकल वरून जात असताना त्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी त्यांचा पाठलाग केला असता आरोपींनी त्यांना हुलकावणी देत दुधे बावी मिरढ जावली बरड ते परत दुधेबावी येथे फिल्मी स्टाईलने पाठलाग करून आरोपींच्याकडे पिस्टल आणि जिवंत का ड तू स असताना सुद्धा झडप टाकून मोठ्या शिताफीने जेरबंद केले.

तब्बल सहा तास दोन संशयीत आरोपी प्रतीक प्रमोद खुंटे मांडकी तालुका पुरंदर व प्रदीप उर्फ सोन्या संतोष गोरे काळुबाई नगर साखरवाडी तालुका फलटण  या पोलिसांच्या पथकास चकवा देत होते. परंतु तब्बल सहा तास पोलिसांच्या या पथकाने तहानभूक हरपून सातत्याने आरोपींचा पाठलाग चालूच ठेवला होता. शेवटी दुधेबावी येथे आरोपींना जेरबंद करण्यात यश आले. प्रतीक खुंटेच्या कमरेला असणारा एक पिस्टल पोलिसांनी मोठ्या चपळाईने हस्तगत करून आरोपींना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आणखी एक गावठी पिस्टल संशयित आरोपी करण कानीफ घोलप, राहणार मंगळवार पेठ फलटण याला दुसरा संशयित आरोपी समीर उर्फ वर्धन बाळासो खवळे राहणार मांडव खडक फलटण याच्या मदतीने आणि मध्यस्थीने विकला असल्याचे कबूल केले .त्याप्रमाणे या दोन्ही आरोपींनाही एक  पिस्टल व काड तूसा सह पुन्हा या दोन आरोपींचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून ताब्यात घेतले. 

फलटण ग्रामीण पोलीस यांना खात्रीशीर माहिती मिळाल्यामुळे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे धाडसी पोलीस उपनिरीक्षक श्री दीपक पवार आणि त्यांचे सहकारी यांनी अतिशय जलद गतीने हालचाल करून मोठ्या धाडसाने चारही आरोपी जेरबंद केल्यामुळे फलटणचे नागरिक तसेच सर्व प्रतिष्ठित सन्माननीय व्यक्तींनी त्यांच्या या कार्याचे कौतुक केले आहे. व पुढील घडणाऱ्या दुर्घटनास आळा बसल्याबद्दल ग्रामीण पोलीस स्टेशनला धन्यवाद दिले आहेत. फलटणचे कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विशाल खांबे यांच्या विशेष मार्गदर्शनाने

ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास मागील तीन महिन्यांमध्ये पाच धाडसी कारवाया करण्यात यश आल्याने फलटण चे उपविभागीय अधिकारी विशाल खांबे. पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा नुसार तातडीने कारवाई करून दोन गावठी पिस्टल, एक जिवंत काडतूस, तीन मोबाईल, एक पल्सर मोटरसायकल, असा तब्बल अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त केला, याबाबत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे विशेष मागील तीन महिन्यात पाच गुन्हे उघडकीस आणल्यामुळे कौतुक केले आहे. 

या गावठी पिस्टलच्या साह्याने या सराईत आरोपींच्या कडून नक्कीच काही दुष्कृत्य घातक घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. कारण हे आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून प्रतीक खुंटे याच्यावर जेजुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल असून फलटण येथील आरोपी करण घोलप यांच्यावर फलटण शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

मशिनरी स्क्रॅपिंग जगतात ‘रोशन इंटरप्रायझेस’चा डंका; वर्धनगडचे सुपुत्र शकील शिकलगार यांचे औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात कौतुकास्पद कार्य

मशिनरी स्क्रॅपिंग जगतात ‘रोशन इंटरप्रायझेस’चा डंका; वर्धनगडचे सुपुत्र शकील शिकलगार यांचे औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात कौतुकास्पद कार्य

विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम

विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम

माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप

माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप

रयतराजच्या दणक्याने  चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....

रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....

पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे

पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे

नो रिअल ....हो! अगदी खरं आहे. रील च्या चक्कर मध्ये आपण रिअल राहिलो नाही.

नो रिअल ....हो! अगदी खरं आहे. रील च्या चक्कर मध्ये आपण रिअल राहिलो नाही.

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला