साताऱ्यात गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकाला अटक; 86 हजारांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सातारा : सातारा शहरातील जगताप कॉलनी परिसरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या एका संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतूस आणि मोबाईल हँडसेट असा एकूण 86 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तेजस अशोक काळे (वय 27, रा. मातंगवस्ती, कोडोली, सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.


पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांनी विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करत होते.

दरम्यान, 26 नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेला सातारा शहरातील जगताप कॉलनी परिसरात अवैध पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित परिसरात कारवाई केली. संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतूस आणि मोबाईल हँडसेट असा एकूण 86 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 959/2026 नुसार भारतीय हत्यार कायदा कलम 3(1), 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक परितोष दातिर तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी केली. कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वरिष्ठांनी अभिनंदन केले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

खुनाच्या गुन्ह्यातील तीन संशयित चिंचणीतून ताब्यात; पुसेगाव व जळगाव पोलिसांची संयुक्त कारवाई

खुनाच्या गुन्ह्यातील तीन संशयित चिंचणीतून ताब्यात; पुसेगाव व जळगाव पोलिसांची संयुक्त कारवाई

साताऱ्यात गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकाला अटक; 86 हजारांचा मुद्देमाल जप्त

साताऱ्यात गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकाला अटक; 86 हजारांचा मुद्देमाल जप्त

 शामगाव घाटातील मसूर फाटा सध्या दहशतमुक्त; कारभाऱ्यांच्या कारवाईमुळे प्रवासी व नागरिकांत समाधानाचे वातावरण.

शामगाव घाटातील मसूर फाटा सध्या दहशतमुक्त; कारभाऱ्यांच्या कारवाईमुळे प्रवासी व नागरिकांत समाधानाचे वातावरण.

औंध पोलिसांची धडक कारवाई; गुन्हेगारी प्रवृत्तीला सणसणीत चाप.

औंध पोलिसांची धडक कारवाई; गुन्हेगारी प्रवृत्तीला सणसणीत चाप.

सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या हवाई कसरतींसाठी साताऱ्यात वाहतूकीतील उद्याचा बदल कसा असणार

सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या हवाई कसरतींसाठी साताऱ्यात वाहतूकीतील उद्याचा बदल कसा असणार

दरोडा तयारीच्या गुन्ह्यातील सात वर्षांपासून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

दरोडा तयारीच्या गुन्ह्यातील सात वर्षांपासून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला