खुनाच्या गुन्ह्यातील तीन संशयित चिंचणीतून ताब्यात; पुसेगाव व जळगाव पोलिसांची संयुक्त कारवाई

पुसेगाव : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील तीन संशयित आरोपींना पुसेगाव आणि जळगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने सातारा जिल्ह्यातील चिंचणी (ता. खटाव) येथून ताब्यात घेतले. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या या तत्पर कारवाईमुळे तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली आहे.

अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५६२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), १०९ व ३(५) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील विपुल किरण गोसावी, मयूर अनिल बोरसे आणि सागर संजय गोसावी (तिघेही रा. नागाव, ता. अमळनेर, जि. जळगाव) हे चिंचणी येथे लपून बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पुसेगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक कोमल शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त कारवाईचे नियोजन करण्यात आले. अमळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे हे आपल्या पथकासह या मोहिमेत सहभागी झाले होते.

पुसेगाव पोलिसांचे सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल जाधव, अविनाश घाडगे, शंकर गलंडे, शुभम निगडे व समाधान चव्हाण यांनी संयुक्तरीत्या मोहीम राबवून तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले.

सातारा आणि जळगाव जिल्ह्यातील पोलिसांनी केलेल्या या समन्वयपूर्ण कारवाईचे कौतुक होत असून, आंतरजिल्हा पोलिस समन्वय आणि गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हेगारांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. गंभीर गुन्ह्यांतील संशयितांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचे या कारवाईतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

खुनाच्या गुन्ह्यातील तीन संशयित चिंचणीतून ताब्यात; पुसेगाव व जळगाव पोलिसांची संयुक्त कारवाई

खुनाच्या गुन्ह्यातील तीन संशयित चिंचणीतून ताब्यात; पुसेगाव व जळगाव पोलिसांची संयुक्त कारवाई

साताऱ्यात गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकाला अटक; 86 हजारांचा मुद्देमाल जप्त

साताऱ्यात गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकाला अटक; 86 हजारांचा मुद्देमाल जप्त

 शामगाव घाटातील मसूर फाटा सध्या दहशतमुक्त; कारभाऱ्यांच्या कारवाईमुळे प्रवासी व नागरिकांत समाधानाचे वातावरण.

शामगाव घाटातील मसूर फाटा सध्या दहशतमुक्त; कारभाऱ्यांच्या कारवाईमुळे प्रवासी व नागरिकांत समाधानाचे वातावरण.

औंध पोलिसांची धडक कारवाई; गुन्हेगारी प्रवृत्तीला सणसणीत चाप.

औंध पोलिसांची धडक कारवाई; गुन्हेगारी प्रवृत्तीला सणसणीत चाप.

सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या हवाई कसरतींसाठी साताऱ्यात वाहतूकीतील उद्याचा बदल कसा असणार

सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या हवाई कसरतींसाठी साताऱ्यात वाहतूकीतील उद्याचा बदल कसा असणार

दरोडा तयारीच्या गुन्ह्यातील सात वर्षांपासून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

दरोडा तयारीच्या गुन्ह्यातील सात वर्षांपासून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला