शामगाव घाटातील मसूर फाटा सध्या दहशतमुक्त; कारभाऱ्यांच्या कारवाईमुळे प्रवासी व नागरिकांत समाधानाचे वातावरण.

  पुसेसावळी :  शामगाव घाटातील मसूर फाटा परिसरात सुरू असलेल्या नियमबाह्य प्रकारांविरोधात सातारा न्यूजमध्ये प्रसिद्ध झालेल्या क्रमशः बातम्यांची दखल मसूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात यांनी घेत या बातम्यांनंतर त्यांनी केलेल्या प्रभावी कारवाईमुळे शामगाव घाटातील मसूर फाटा परिसर दहशतमुक्त झाला असून, येथील परिस्थितीत सकारात्मक बदल दिसून येत आहे. या कारवाईमुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी मोठा सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

                मसूर फाटा परिसरात पूर्वी जाणवणारे तणावाचे आणि नियमबाह्य प्रकारांचे वातावरण निवळल्याने प्रवासी व नागरिक आता मोकळा श्वास घेत आहेत. दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना आणि आसपासच्या शेतकरी आणि नागरिकांना सुरक्षिततेची भावना मिळाल्याने परिसरात समाधानाचे आणि दिलाशाचे वातावरण निर्माण झाले आहे.

                शामगांव घाटातील मसूर फाट्यावरील गैरप्रकारांकडे लक्ष वेधणाऱ्या आणि पाठपुरावा करणाऱ्या सातारा न्यूजचे तसेच परिस्थितीवर तत्परतेने नियंत्रण मिळवणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात यांचे प्रवासी व नागरिकांकडून मनापासून आभार मानले जात आहेत. या संपूर्ण घडामोडीबाबत नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, सातारा न्यूज आणि सहायक पोलीस निरीक्षकांच्या भूमिकेचे स्वागत करणारी अनुकूल चर्चा सुरू आहे.

                 मसूर फाट्यावरील नियमबाह्य प्रकारांना सध्या ब्रेक लागला असला तरी, भविष्यात कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर वाहतूक किंवा नियमबाह्य कृत्य केल्यास संबंधित व्यक्तींना कारवाईला सामोरे जावे लागेल. हा इशारा गैरप्रकार करणाऱ्यांनी विसरून जाऊ नये आणि प्रत्येक नागरिक व प्रवाशाने नियमांचे पालन करून स्वतःची व इतरांची खबरदारी घ्यावी, असा सकारात्मक संदेश या निमित्ताने दिला जात आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

 शामगाव घाटातील मसूर फाटा सध्या दहशतमुक्त; कारभाऱ्यांच्या कारवाईमुळे प्रवासी व नागरिकांत समाधानाचे वातावरण.

शामगाव घाटातील मसूर फाटा सध्या दहशतमुक्त; कारभाऱ्यांच्या कारवाईमुळे प्रवासी व नागरिकांत समाधानाचे वातावरण.

औंध पोलिसांची धडक कारवाई; गुन्हेगारी प्रवृत्तीला सणसणीत चाप.

औंध पोलिसांची धडक कारवाई; गुन्हेगारी प्रवृत्तीला सणसणीत चाप.

सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या हवाई कसरतींसाठी साताऱ्यात वाहतूकीतील उद्याचा बदल कसा असणार

सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या हवाई कसरतींसाठी साताऱ्यात वाहतूकीतील उद्याचा बदल कसा असणार

दरोडा तयारीच्या गुन्ह्यातील सात वर्षांपासून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

दरोडा तयारीच्या गुन्ह्यातील सात वर्षांपासून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

२६/११ च्या शहीदांना अभिवादन; सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे उद्या महा रक्तदान शिबिराचे आयोजन

२६/११ च्या शहीदांना अभिवादन; सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे उद्या महा रक्तदान शिबिराचे आयोजन

शाळेच्या उंबरठ्यावर जुगाराचा बाजार सुरूच; शाहूपुरी पोलिसांचे 'अर्थपूर्ण' मौन की 'राजा'श्रयापुढे प्रशासन हतबल?

शाळेच्या उंबरठ्यावर जुगाराचा बाजार सुरूच; शाहूपुरी पोलिसांचे 'अर्थपूर्ण' मौन की 'राजा'श्रयापुढे प्रशासन हतबल?

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला