म्हसवडच्या सराफ व्यावसायिकाची धाडसी लूट उघड; ११ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त, चार आरोपी अटकेत
सातारा स्थानिक गुन्हे शाखा व म्हसवड पोलिसांची संयुक्त कारवाईSatara News Team
- Sat 28th Nov 2026 01:22 pm
- बातमी शेयर करा
सातारा : म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवापूर ते पळसावडे मार्गावर सराफ व्यावसायिकाला कारने धडक देऊन तलवारीचा धाक दाखवत सोन्या-चांदीचे दागिने लुटल्याच्या धाडसी रोड रॉबरीचा गुन्हा सातारा स्थानिक गुन्हे शाखा व म्हसवड पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ११ लाख ५० हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली कार व हत्यार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातारा-सांगली जिल्ह्याच्या सीमेलगत देवापूर ते पळसावडे मार्गावर सराफ व्यावसायिक नवनाथ वसंत खुपकर हे मोटारसायकलवरून जात असताना आरोपींनी त्यांना कारने धडक देऊन जखमी केले. त्यानंतर तलवारीचा धाक दाखवून व दमदाटी करत त्यांच्याकडील सोन्या-चांदीच्या दागिन्यांची बॅग हिसकावून आरोपी सांगली जिल्ह्याच्या दिशेने पसार झाले होते. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या धाडसी लुटीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव व उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके व म्हसवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमण यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने घटनास्थळी भेट देऊन उपलब्ध पुरावे, तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला. तपासादरम्यान गुन्हा करणाऱ्या संशयितांची माहिती अवघ्या २४ तासांत निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी पथके तैनात केली होती.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सोलापूर जिल्ह्यातील धुळदेव-पिलीव घाट परिसरातून तीन संशयितांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यांच्याकडे केलेल्या तपासातून या गुन्ह्यात आणखी आरोपी सहभागी असल्याचे तसेच सराफ व्यावसायिकाच्या हालचालींवर पाळत ठेवून लुटीचा कट आखण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यात स्थानिक आरोपीने इतर आरोपींना मदत केल्याचेही तपासात समोर आले.
या प्रकरणी अजय सत्यवान शिरतोडे (रा. वाकी शिवणे, ता. सांगोला), शुभम दुर्योधन बोडरे (रा. वाकी शिवणे, ता. सांगोला), रोहित दादासाहेब जाधव (रा. महूद, ता. सांगोला) व सुनील मारुती मंडले (रा. देवापूर, ता. माण) यांना अटक करण्यात आली आहे.
अटक आरोपींकडून ३ तोळे सोन्याचे दागिने, ३ किलो चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार व हत्यार असा एकूण ११ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून, गुन्हा उघडकीस आणून कौशल्यपूर्ण तपास केल्याबद्दल पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि म्हसवड पोलीस पथकाचे अभिनंदन केले.
#crime#satarapolice#satarasp#mahswad
स्थानिक बातम्या
खुनाच्या गुन्ह्यातील तीन संशयित चिंचणीतून ताब्यात; पुसेगाव व जळगाव पोलिसांची संयुक्त कारवाई
- Sat 28th Nov 2026 01:22 pm
साताऱ्यात गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकाला अटक; 86 हजारांचा मुद्देमाल जप्त
- Sat 28th Nov 2026 01:22 pm
शामगाव घाटातील मसूर फाटा सध्या दहशतमुक्त; कारभाऱ्यांच्या कारवाईमुळे प्रवासी व नागरिकांत समाधानाचे वातावरण.
- Sat 28th Nov 2026 01:22 pm
औंध पोलिसांची धडक कारवाई; गुन्हेगारी प्रवृत्तीला सणसणीत चाप.
- Sat 28th Nov 2026 01:22 pm
सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या हवाई कसरतींसाठी साताऱ्यात वाहतूकीतील उद्याचा बदल कसा असणार
- Sat 28th Nov 2026 01:22 pm
दरोडा तयारीच्या गुन्ह्यातील सात वर्षांपासून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
- Sat 28th Nov 2026 01:22 pm
संबंधित बातम्या
-
खुनाच्या गुन्ह्यातील तीन संशयित चिंचणीतून ताब्यात; पुसेगाव व जळगाव पोलिसांची संयुक्त कारवाई
- Sat 28th Nov 2026 01:22 pm
-
साताऱ्यात गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकाला अटक; 86 हजारांचा मुद्देमाल जप्त
- Sat 28th Nov 2026 01:22 pm
-
हरळीतील घरफोडीचा गुन्हा उघड; खंडाळा पोलिसांकडून चार संशयितांना अटक, चोरीचा मुद्देमाल हस्तगत
- Sat 28th Nov 2026 01:22 pm
-
औंध पोलिसांची धडक कारवाई; गुन्हेगारी प्रवृत्तीला सणसणीत चाप.
- Sat 28th Nov 2026 01:22 pm
-
दरोडा तयारीच्या गुन्ह्यातील सात वर्षांपासून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
- Sat 28th Nov 2026 01:22 pm
-
पुसेसावळीतील अवैध धंद्यांवर पोलिस कारवाईची धार हवी; केवळ धाडी पुरेशा की मुळावर घाव गरजेचा?
- Sat 28th Nov 2026 01:22 pm
-
ढेबेवाडीत मगर बंधू ज्वेलर्समध्ये चोरी; नऊ तोळे सोने लंपास!
- Sat 28th Nov 2026 01:22 pm
-
महामार्गावर कवठे गावानजीक एक किलो सोने दरोडेखोरांनी लुटले
- Sat 28th Nov 2026 01:22 pm









