फलटण शहर पोलीस स्टेशन ने बनावट इंस्टाग्राम आयडी द्वारे बदनामी आणि त्रास देणाऱ्या दोन संशयित आरोपींना ठोकल्या बेड्या.
Satara News Team
- Sun 7th Jun 2026 01:06 pm
- बातमी शेयर करा
फलटण. फलटण शहरात एका पीडित महिलेची आणि पतीची बनावट इंस्टाग्राम आयडी तयार करून बनावट वेगवेगळ्या अकाउंट वरून संशयित आरोपी प्रमोद सनद कांबळे राहणार लक्ष्मी नगर फलटण आणि त्याला दुसऱ्यांचे सिमकार्ड देणारा आणि मदत करणारा व्ही आय कंपनीचा सिम कार्ड विक्रेता अनिल बाळू मोहिते राहणार वाठार निंबाळकर तालुका फलटण यांनी इंस्टाग्राम अकाउंट वर वेगवेगळे बनावट अकाउंट तयार करून महिलेचे व्हिडिओ मॉर्फ करून नाहक बदनामी आणि त्रास देत होते. विविध अश्लील व्हिडिओ अश्लील मेसेजेस द्वारे पीडित महिलेच्या आणि पतीची सातत्याने बदनामी करत होते.

पीडितांनी फलटण शहर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून तक्रार नोंदवल्यावर उपविभागीय अधिकारी फलटण श्री विशाल खांबे आणि पोलीस उपनिरीक्षक श्री अरविंद काळे यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन फलटण शहर पोलीस स्टेशनचे सतर्क आणि चाणाक्ष पोलीस उपनिरीक्षक श्री दिनेश काळे यांच्यासमवेत फलटण शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष आणि शिस्तबद्ध इतर सहकारी पोलीस उपनिरीक्षक मिठू जगदाळे, श्री बापूराव धायगुडे, स्वप्निल खराडे, जितेंद्र टिके, निखिल गायकवाड, गणेश अवघडे ,जयदीप यादव अतुल बडे यांचे तपासी पथक तयार करून या दोन आरोपींच्या पर्यंत कोणताही धागा दोरा नसताना शीताफिने पोहोचून त्यांना पोलिसी हिसका दाखवून तात्काळ जेरबंद केले. या गुन्ह्याचा सखोल तपास करून भारतीय न्याय संहिता78,79,356(2) आणि माहिती व तंत्रज्ञान अधिनियम66 सी,67,67 अ प्रमाणे गुन्हा दाखल करून या दोन्ही संशयित आरोपींच्या मुस्क्या आवळून पिडीतांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि श्री विशाल खांबे यांच्या विशेष मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक अरविंद काळे आणि दिनेश शिंदे यांच्या पथकाने अहोरात्र मेहनत घेतल्याने हे दोन चाणाक्ष संशयित आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. यामुळे पीडितांनी सुटकेचा श्वास सोडला असून फलटण शहरातील नागरिकांनी याबाबत या पथकाचे विशेष कौतुक केले आहे.
श्री दिनेश शिंदे हे पुण्यासारख्या सोशल मीडिया मध्ये घडणाऱ्या अशा प्रकारच्या गुन्ह्याबाबत अग्रेसर असणाऱ्या शहरात अशा प्रकारचे गुन्हे तपास कामात निष्णात असल्यामुळे त्यांनी परत एकदा आपल्या कर्तव्याची चुणूक दाखवून दिली आहे. फलटण शहर पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांना आवाहन केले आहे की अशा प्रकारचा कोणत्याही नागरिकांना त्रास झाल्यास घाबरून न जाता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
स्थानिक बातम्या
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Sun 7th Jun 2026 01:06 pm
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sun 7th Jun 2026 01:06 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Sun 7th Jun 2026 01:06 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Sun 7th Jun 2026 01:06 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Sun 7th Jun 2026 01:06 pm
संबंधित बातम्या
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Sun 7th Jun 2026 01:06 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Sun 7th Jun 2026 01:06 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Sun 7th Jun 2026 01:06 pm
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Sun 7th Jun 2026 01:06 pm
-
सातारा पोलिसांची धडक कारवाई; सुमारे १९ लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Sun 7th Jun 2026 01:06 pm
-
गुणवरेचा गांजा उत्पादक शेतकरी अंकुश कोळेकर ला फलटण ग्रामीण पोलिसांनी गांजा सह घेतले ताब्यात.
- Sun 7th Jun 2026 01:06 pm
-
पुसेगाव पोलिसांची मोठी कारवाई; खटाव जवळील मळवी शिवारात हातभट्टीवर छापा, १ लाख १ हजारांचा मुद्देमाल जप्त!
- Sun 7th Jun 2026 01:06 pm
-
स्थानिक गुन्हे शाखा व वडूज पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 17.09 लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Sun 7th Jun 2026 01:06 pm












