घाटाई परिसरातील जमिनींवर राजकीय धनिकांची काळी नजर त्यात राज्याचे मंत्री सुद्धा

कास : कास पठाराला महत्त्व काय आले, नि धनिकांच्या नजरा कास पठारावर खिळल्या गेल्या. कास पठारला कसं लुटायचं, आपला निजी फायदा कसा करायचा? यासाठी राजकीय धनिकांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली. त्यांनी आजूबाजूच्या जमिनी कवडीमोल भावाने विकत घेतल्या.
आज यवतेश्वर  ते कास पट्ट्यात बाहेरील धनिकांची हॉटेल दिसतील. त्यांच्या आर्थिक ताकदीसमोर स्थानिक बेजार झालेला आढळतो. त्यामुळे कास पठारावरील रस्ता घाटाईमार्गे पळविण्याचा घाट घातल्याचा आरोप भांबवली पर्यटन प्रमुख रवींद्र मोरे यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे, की यवतेश्वर ते कास पठार जमिनी बाहेरच्या धनिकांनी बळकाविल्यावर, त्यानंतर राजकीय धनिकांची नजर कास पठारानजीक असलेल्या घाटाई परिसरातील जमिनींवर पडली. राजकीय धनिकांनी या परिसरात मुबलक जमीन खरेदी केली आहे. त्यात महाराष्ट्र राज्याचे मंत्री सुद्धा आहेत. या जमिनीचा फायदा उठविण्यासाठी, कास पठार रस्ता बंद केला नसावा ना? असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.
स्‍थानिकांच्‍या मागणीकडे काणाडोळा


आजच्या घडीला, घाटाई मार्गावर जमीन खरेदी केलेल्या धनिकांनी अशी काही सेटिंग लावून ठेवली आहे, की घाटाई मार्ग सुरू झाला आहे व कास पठार मार्ग बंद पडला आहे. कास पठार रस्ता हा बामणोली खोऱ्यातील २२ गावांना व भांबवली परिसरातील ९ गावांना सोईचा आहे. बामणोली बोटिंग, शेंबडी मठ, वासोटा ट्रेकिंग, भांबवली वजराई धबधबा येथील पर्यटन हे कास पठार रस्त्यामुळे सोईचे होते. पर्यटन वाढीसाठी व ३१ गावच्या रहदारीसाठी कास पठारावरील रस्ताच उपयुक्त आहे व तेथील स्थानिकांनी तशी मागणी देखील केली आहे; पण त्यांच्या मागणीकडे काणाडोळा केला गेला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला