आमिर मुजावर आणि सात साथीदारांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई.पो.अ.समीर शेख यांचा दणका

सातारा : सातारा शहरांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या अमीर इम्तियाज मुजावर आणि त्याच्या सात साथीदारांना मोक्का लागू करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कार्यभार स्वीकारताच संघटित गुन्हेगारीच्या विरोधात मोक्का कारवाईचे शस्त्र उपसले आहे. संघटित गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगार नियंत्रण अधिनियम यामुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना या संदर्भातील सूचना करण्यात आल्या आहेत. अमीर इम्तियाज मुजावर वय 22 राहणार पिरवाडी, अमीर सलीम शेख राहणार वनवासवाडी, अभिषेक राजू भिसे वय 20 राहणार काळे वस्ती झोपडपट्टी सातारा, आहद शेख, ओमकार राजू भिसे राहणार काळे वस्ती मोळाचा ओढा-सैदापुर, संग्राम विजय जाधव भक्तवडी तालुका कोरेगाव, यश सुभाष साळुंखे राहणार मोळाचा ओढा, आयुब अत्तार 426 शनिवार पेठ यांच्या विरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला