शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल

म्हसवड : ढाकणी येथे शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मल्हारी पांडुरंग खाडे (वय 48, रा. ढाकणी, ता.माण जि. सातारा) याच्यावर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मल्हारी पांडुरंग खाडे हा ग्रामसेवक असून तो सध्या पंचायत समिती जावळी, तालुका जावळी येथे कार्यरत आहे. 

 याबाबत पीडीत महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन, संबंधित महिला स्वतःच्या शेतात मका खुरपणीचे काम करत असताना मल्हारी पांडुरंग खाडे हा चारचाकी गाडीतून आला व उसने घेतलेले पैसे परत देण्याच्या बहाण्याने त्याने महिलेला जवळ बोलवून तिच्या शरीराला स्पर्श करत तिचा विनयभंग करुन तिच्या ब्लाऊजमध्ये ठेवलेले २ हजार रुपये देखील जबरदस्तीने चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

 सदर घटनेची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे हे करीत आहेत.


आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला