साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई

सातारा : सातारा येथे मागील चार दिवसांपूर्वी महामार्गावरील उड्डाणपुलावर चारचाकी वाहने घेऊन रील्स बनवणाऱ्या ५ जणांवर सातारा पोलिसांनी कारवाई केली आहे. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये ओम प्रविण जाधव (वय २१ वर्षे रा. तारळे ता. पाटण जि. सातारा सध्या रा. जुना आर. टी. ओ चौक सातारा), कुशल सुभाष कदम (वय रा. सदरबझार जरंडेश्वर नाका सातारा), सोहम महेश शिंदे (वय २० वर्षे रा. शिंगणापूर ता. माण जि. सातारा), निखील दामोदर महांगडे (वय २७ वर्षे रा. परखंदी ता. वाई जि. सातारा) तसेच एका अल्पवयीन युवकाचा समावेश आहे. 

  याबाबत अधिक माहिती अशी कि, एका युवकाने सातारा येथे नवीन वाहन खरेदी केले होते. त्यावाहनाचे ड्रोनच्या सहाय्याने चित्रिकरण करण्यासाठी त्याने त्याचे अन्य साथीदारांना वाहने बोलावून घेवून ती वाहने सातारा-बेंगलोर हायवेवरील कोल्हापूर ते पुणे जाणारे लेनवर जाणाऱ्या वाहनांना अडवून ठेवली. तसेच आपल्या सोबतची वाहने हायवेवर वाहतुकीस अडथळा होईल, अशी थांबवून ड्रोनच्या मदतीने त्याचे चित्रीकरण केले. व ते इन्स्टाग्रामवर त्याची रील बनवून व्हायरल केली होती. त्याबाबत पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेवून संबंधीत युवकांवर इन्स्टाग्रामवरून माहिती प्राप्त करून गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. त्यानुसार वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली सातारा शहर डी. बी. पथक, सातारा वाहतूक नियंत्रण विभाग, भुईंज येथील महामार्ग पोलीस यांनी सदर रिल्सवरून संबंधितीत वाहन चालक, ड्रोन वापरणारे यांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेवून त्यांचेवर कारवाई केलेली आहे. तसेच त्यांचे अन्य साथीदार यांची माहिती घेवून त्यांचेवर कारवाई करण्यात येणार आहे.

 दरम्यान, सातारा जिल्हा पोलीस दलाकडून आवाहन करण्यात येते की, नवीन वाहन खरेदी, लग्न समारंभ, वाढदिवस अशा विविध कार्यक्रमामध्ये काही युवक हे जाणीवपूर्वक सामान्य लोकांना वाहतुकीस व रहदारीस अडथळा होवील अशा प्रकारे वाहनांचा वापर करून त्याचे चित्रिकरण करीत आहेत. व ते इन्स्टाग्राम व इतर सोशल मिडीयावर व्हायरल करीत आहेत. त्यांची माहिती घेवून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

 सदरची कारवाई पोलीस अधिक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधिक्षक, डॉ. श्रीमती वैशाली कडुकर, उपविभागिय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा राजीव नवले, वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि शामराव काळे, अभिजीत यादव, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो.हवा. सुजीत भोसले, सुहास पवार, रमेश शिखरे, निलेश विक्रम माने, पो.ना. पंकज मोहिते, पो.कॉ. सुशांत कदम, तुषार भोसले, सचिन रिटे, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुहास कदम यांनी केलेली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला