सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत

सातारा : सातारा शहरात व तालुक्यामध्ये मोबाईल चोरांचा सुळसुळाट झाल्यामुळे बऱ्याच तक्रारी दाखल झाल्या होत्या त्यामुळे सातारा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री निलेश तांबे यांना हरवलेले मोबाईल फोनचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोर्टल व तांत्रिक बाबींच्या आधारे निलेश तांबे यांनी महाराष्ट्रातून तसेच परराज्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यात संपर्क करून हरवलेल्या मोबाईल शोधण्यासाठी मोहीम राबवली त्यामुळे सातारा तालुका हद्दीमध्ये घायाळ झालेल्या एकूण अकरा लाख 40 हजार रुपये किमतीचे 76 मोबाईल हस्तगत करण्यात आले सदरची मोहीम वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. सदर मोबाईल पैकी 53 मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले उर्वरित 23 मोबाईल हे परत देण्याच्या प्रक्रिया चालू आहेत.


 सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक साो, सातारा, श्री तुषार दोशी साो, मा. अपर पोलीस अधीक्षक साो, सातारा, श्रीमती वैशाली कडुकर, मा. उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा श्री राजीव नवले, सातारा तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली सीईआयआर पोर्टलचे कामकाज पाहणारे मपोकॉ वर्षा देशमुख यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, श्री. विनोद नेवसे, पो हवा राजु शिखरे, पो हवा मनोज गायकवाड, पोहवा पंकज ठाणे, पो हवा दादा स्वामी, मपोहवा विदया कुंभार, पोना प्रदिप मोहिते, पोकॉ संदिप पांडव, मपोकॉ फणसे यांच्या सहकार्याने केलेली आहे.सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे श्री तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कड्डुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री राजीव नवले, मा. उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला