पोलीस असल्याचा बहाणा करून वडूज येथे वृद्धास लुटले
पोलीस असल्याचा बहाणा करून वडूज येथे वृद्धास लुटलेSatara News Team
- Mon 20th May 2024 03:58 pm
- बातमी शेयर करा
वडूज, : पोलीस असल्याचा बहाणा करून भामट्याने वृद्धास लुटल्याची घटना वडूज-पुसेगाव मार्गावर वाकेश्वर गावच्या हद्दीत घडली. या गुन्ह्याची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, गोडसेवाडी (ता. माण) येथील हणमंत शंकर कदम (वय ६४) हे काही कामानिमित्त वडूज येथे आले होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी इसम दुचाकीवरून कदम यांच्या गाडीचा पाठलाग करीत आला. ‘तुम्ही गोडसेंचा खून केला आहे.
तुम्ही आरोपी वाटताय असे म्हणत तुम्हाला चेकिंग करायचे आहे. पुढे चेकिंग चालू आहे’ असे म्हणून अनोळखी व्यक्तीने कदम यांच्याजवळ असलेले १२ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व गळ्यातील दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन तसेच डायरी असा ऐवज काढण्यास सांगितले.
‘ते मी बांधून तुमच्या गाडीच्या डिकीमध्ये ठेवतो’ असे सांगून अनोळखी व्यक्तीने पोलीस असल्याचे भासवून फसवणूक करून ऐवज लंपास केला. दरम्यान, या गुन्ह्याची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास हवालदार एम. डी. हांगे करीत आहेत.
#chori
स्थानिक बातम्या
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Mon 20th May 2024 03:58 pm
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Mon 20th May 2024 03:58 pm
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Mon 20th May 2024 03:58 pm
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Mon 20th May 2024 03:58 pm
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Mon 20th May 2024 03:58 pm
संबंधित बातम्या
-
ढेबेवाडीत मगर बंधू ज्वेलर्समध्ये चोरी; नऊ तोळे सोने लंपास!
- Mon 20th May 2024 03:58 pm
-
महामार्गावर कवठे गावानजीक एक किलो सोने दरोडेखोरांनी लुटले
- Mon 20th May 2024 03:58 pm
-
खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी तीन हजारांची लाच; मंडलाधिकारी रंगेहाथ जाळ्यात
- Mon 20th May 2024 03:58 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Mon 20th May 2024 03:58 pm
-
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Mon 20th May 2024 03:58 pm
-
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Mon 20th May 2024 03:58 pm
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Mon 20th May 2024 03:58 pm
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Mon 20th May 2024 03:58 pm













