32 लाखांच्या फसवणूक प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा

सातारा : आमच्या संस्थेत पैसे गुंतवल्यास चांगला परतावा देतो, असे सांगून चौघांनी वृध्दाला 32 लाख रुपयांना फसवले. याप्रकरणी सातार्‍यातील तिरुपती डेव्हलपर्स न्ड शेअर ब्रोकर्स संस्थेच्या पदाधिकार्‍यांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अंकिता हरी शिरतोडे, हरी धोंडीराम शिरतोडे, काजल रोहित वियकायदे, अरुण अमृत घोरपडे (सर्व रा.बुधवार नाका, दौलतनगर, सातारा) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी राजू बबलू पटेल (वय 60, रा. करंजे, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना नोव्हेबर 2021 ते 19 नोव्हेबर 2023 या कालावधीत घडलेली आहे. संशयितांनी तक्रारदार पटेल यांना पैसे गुंतवल्यास त्याचा दर महिन्याला चांगला परतावा देवू, असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानुसार तक्रारदार पटेल यांनी वेळोवेळी 32 लाख रुपये गुंतवले. त्याबाबतच्या पावत्या, पुरावे तक्रारदार यांच्याकडे आहेत. पैसे गुंतवल्यानंतर संशयितांनी सुरुवातीला मोबदला म्हणून 9 लाख रुपये तक्रारदार यांना दिले. मात्र त्यानंतर संशयितांनी पैसे देणे बंद केले. याप्रकरणी तक्रारदार यांनी संशयितांकडे पाठपुरावा केला असता संशयितांनी त्यांनाच दमबाजी करत खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यामुळे अखेर तक्रारदार यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात जावून घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी चौघांविरुध्द गुन्हा दाखल केला.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला