प्रदूषण महामंडळ अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा : रयत क्रांती शेतकरी संघटनेची मागणी

सातारा : शेतकरी आंदोलनात वयाच्या दहाव्या वर्षापासून ते वृद्ध काळापर्यंत सक्रिय राहण्याचा इतिहास आहे. मात्र या इतिहासाची कोणतीही माहिती न घेता चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा तसेच रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना उर्मट भाषेत बोलणाऱ्या प्रदूषण महामंडळ अधिकारी लि.सु.भड याची खातेनिहाय चौकशी करून तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी रयत क्रांती शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी केली आहे.

लिंब ता.सातारा येथे असलेल्या यशराज इथेनॉल प्रकल्पाच्या माध्यमातून प्रदूषण होत असल्याची तक्रार प्रकाश साबळे यांनी केली होती. तसेच यापूर्वीही शेतकरी संघटनेने तीव्र स्वरूपाचे आंदोलनही पुकारलेले होते. मात्र लेखी निवेदन व लोकशाही मार्गाने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला प्रदूषण महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी लि.सू.भड यांनी विशिष्ट हेतू समोर ठेवून केराच्या टोपल्या दाखवल्या आहेत. तसेच तक्रारी अर्ज स्वीकारताना व त्यावर उत्तर देताना अधिकारी भड यांनी शेतकरी संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उर्मट भाषेत उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कृतीचा जाहीर निषेध करण्यात येत असून अधिकारी श्री.भड यांचा कालावधी उलटून देखील त्यांना अतिरिक्त  वर्ष काम करण्याची संधी साताऱ्यात का दिली गेली आहे. ह्याचा आता सखोल तपास होणे गरजेचे आहे. तसेच अधिकारी भड यांच्या सर्व मालमत्ता तपासणीच्या आता वेळ आली असून जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तात्काळ आदेश द्यावेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत भड यांना निलंबित करण्यात यावे. अन्यथा रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने येत्या आठ दिवसात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी दिला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला