टीडीएल ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी

मृत सहकाऱ्याच्या कुटुंबाला केली लाखाची मदत
TDL Group maintains social commitment

दहिवडी : मालवाहतूक चालक-मालक सामाजिक विकास संस्था संचलित टीडीएल ग्रुप यांचे वतीने वाहन- चालक सभासद असणाऱ्या राजाभाऊ तुळशीराम बोरकर, मु .पो. ईसाद, ता गंगाखेड,जि. परभणी व तीस वर्ष या सभासदाचा गतवर्षी दिनांक 29 जुलै रोजी घराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी लाखाची मदत करण्यात आली.घरात कमावणारा कर्ता पुरुष म्हणून तेच होते. त्यांच्यानंतर कुटुंबाला हातभार लावणारे कोणी नसल्याने त्यांच्या पश्चात आई-वडील ,भाऊ ,पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या सर्वांना त्यांची कमी भासू नये यासाठी आणि पुन्हा फुलाची पाकळी म्हणून आपल्याकडून त्यांच्या कुटुंबाला कुटुंबाला हातभार लावण्यासाठी म्हणून एक लाख रुपयाची मदत करण्यात आली.टीडीएल ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचेवतीने सामाजिक हिताचिंतक बांधीलकी मदत कार्य या तत्त्वावर आधारित मासिक सामाजिक जमा फंड रक्कम प्रकल्पातून त्यांच्या पत्नी सौ.मीरा राजाभाऊ बोरकर यांना मुलांचे शिक्षणकामी तसेच सांसारिक अडचणी सोडवण्यासाठी एक लाख रुपये रक्कम अदा करण्यात आली. कोरोनाच्या काळात माणुसकीच्या नात्यातून सर्व चालक-मालक लोकांनी एकत्र येऊन नियम व अटी घालून घेत  माणुसकी हाच धर्म आणि माणुसकी हित जात... यानुसार आमचा सदैव सामाजिक मदतीस हात! या संकल्प तत्वावर आधारलेल्या टीडीएल ग्रुपने महाराष्ट्रभर अशीच अनेक कामे केल्याची माहिती टीडीएल ग्रुपचे संस्थापक-अध्यक्ष,धनराज दगडे यांनी दिली.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला