बुरखा घालून आलेल्या युवकाला मारहाण तामजाईनगरमध्ये आला होता मैत्रिणीला भेटायला,
मुले पळवायला आल्याच्या संशयातून बदडले,Satara News Team
- Fri 30th Sep 2022 04:13 pm
- बातमी शेयर करा
सातारा : दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास करंजे येथील तामजाईनगरमध्ये एक युवक बुरखा घालून आला होता. तो शाळेचे नाव विचारात होता. यावेळी तेथील एका दुकानदाराला संशय आल्याने त्याने त्याला पकडले. यावेळी बुरख्यात युवक असल्याचे लक्षात येताच हा मुले पळवायला आला की काय, अशा संशयाने त्याला मारहाण करण्यात आली. तोच शाहूपुरी पोलिसांना फोन करून युवकाला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच तो मैत्रिणीला भेटायला आल्याचे सांगितले.
तामजाईनगरमध्ये शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एक युवक बुरखा घालून आपल्या मैत्रिणीला भेटायला आला होता. तिच्या घरचा पत्ता माहिती नसल्याने तो शाळा कुठे आहे. अशी हिंदी भाषेतून विचारणा करू लागला. बुरख्यातून पुरूषाचा आवाज येत असल्याने दुकानदाराला संशय आला. त्याने युवकाला उलटसुलट प्रश्न विचारले, युवकाला पकडून ठेवले. यामुळे हा युवक पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. दुकानदाराच्या ही बाब लक्षात येताच त्याने आरडाओरडा करत इतर लोकांना बोलवले. लोकांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. बघता बघता परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. यातील एकाने शाहूपुरी पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी पोहचले आणि युवकाला ताब्यात घेतले. त्याला पोलीस ठाण्यात नेऊन खाक्या दाखवताच तो घडाघडा बोलू लागला. तो मैत्रिणीला भेटायला आला होता. तिच्या घरी हे मान्य नसल्याने तो बुरखा घालून आल्याचे पोलिसांना सांगितले. पोलीसांनी त्याच्याकडून चांगल्या वर्तनुकीचा बॉन्ड भरून घेतला.
मुले पळविणारी टोळीची अफवाच
शहरात मुले पळविणारी टोळी आली आहे. ही अफवा प्रत्येकांच्या मनात आहे. यामुळे घटना घडली की, त्याला टोळी आली हेच नाव दिले जात आहे. परंतु घटनेमागचे वास्तव वेगळे असते. ही बाब आता सगळयांनी लक्षात ठेवली पाहिजे. आणि मुले पळविणाऱया अफवांना बळी पडू नका असे आवाहन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनीही केले आहे.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय दिना पाटील यांचा निषेध
- Fri 30th Sep 2022 04:13 pm
सराईत घरफोड्या चोरट्याच्या टोळीचा पर्दाफाश; 27.65 लाखांचा मुद्देमाल जप्त
- Fri 30th Sep 2022 04:13 pm
सातारा न्यूजचा दणका, अन्न व औषध प्रशासनाकडून फलटणमध्ये मोठी कारवाई
- Fri 30th Sep 2022 04:13 pm
कॉपर वायर व ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी टोळी गजाआड; 26 गुन्ह्यांची उकल, 20.22 लाखांचा मुद्देमाल जप्त.
- Fri 30th Sep 2022 04:13 pm
साताऱ्यात देशी पिस्टलसह संशयित जेरबंद; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
- Fri 30th Sep 2022 04:13 pm
सातारा जिल्ह्यातील शिवसेनेत शीतयुद्ध; लाभार्थ्यांची टोळी विरुद्ध निष्ठावंत - रणजितसिंह भोसले
- Fri 30th Sep 2022 04:13 pm





