कॉपर वायर व ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी टोळी गजाआड; 26 गुन्ह्यांची उकल, 20.22 लाखांचा मुद्देमाल जप्त.
Satara News Team
- Wed 17th Jun 2026 05:32 pm
- बातमी शेयर करा
सातारा : बोरगाव पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांच्या संयुक्त कारवाईत शेतीपंपाच्या कॉपर वायर व ट्रान्सफॉर्मर (डी.पी.) चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून 26 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत 20 लाख 22 हजार 482 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दोन महिन्यांपासून शेतीपंपाच्या कॉपर वायर व ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटना वाढल्या होत्या. याबाबत पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान गोपनीय माहिती, सायबर विश्लेषण व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी हर्षद जाधव (रा. सासपडे), स्वप्नील मगर (रा. ढोरोशी), विकास कदम (रा. मरळोशी), विवेक लादे (रा. सासपडे) आणि शेखर सावंत (रा. निवडे) या पाच आरोपींना अटक केली. चौकशीत त्यांनी मुख्य आरोपी सागर मोरे (रा. भुडकेवाडी, ता. पाटण) व इतर साथीदारांसह विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपींकडून बोरगाव, कोरेगाव, सातारा तालुका, सातारा शहर, भुईंज आणि उंब्रज पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण 26 चोरीचे गुन्हे उघडकीस आले. त्यामध्ये बोरगावचे 5, कोरेगावचे 10, सातारा तालुक्याचे 5, सातारा शहरचे 2, भुईंजचे 3 आणि उंब्रजचा 1 गुन्हा समाविष्ट आहे.
कारवाईदरम्यान चोरीसाठी वापरण्यात आलेली एक पिकअप, चार मोटारसायकली, पाच मोबाईल, चोरीसाठी लागणारे साहित्य, चोरीचा मुद्देमाल व रोख रक्कम असा एकूण 20.22 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही निखील पिंगळे पोलीस अधीक्षक सातारा वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा व राजीव नवले पोलीस उपविभागीय अधीकारी सातारा उपविभाग सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके स्थानीक गुन्हे शाखा सातारा, बोरगांव पोलीस ठाणेचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, पो उप निरी एम.ई. पाटील, एस.एम. बसवंत, डी. बी. पथकातील पोलीस अंमलदार सह पो उप निरी प्रविण शिंदे, सह पो उप निरी रफिक काझी, पो हवा निलेश गायकवाड, पो हवा दिपककुमार मांडवे, पो. हवा विजय म्हेत्रे, पो हवा संजय खाडे, पो हवा सुनील कर्ण, पो.हवा प्रविण नावडकर, पोना रफिक शेख, पोना नंदकुमार कचरे, पोना प्रशांत चव्हाण, पो.ना जगदीश कणसे, पॉ. कॉ सुमीत साळुंखे, पॉ. कॉ. ज्ञानेश ढाणे, पो. काँ. विशाल जाधव, पो. काँ. समाधान जाधव, पो. काँ. केतन जाधव यांनी केलेली आहे. तसेच स्थानीक गुन्हे शाखा सातारा यांचेकडील पोउपनिरी परितोष दातीर, सहपोउपनिरी, इसाक मुलानी, पो हवा साबीर मुलानी, पो हवा अमोल माने, पो हवा जयवंत खांडके, पो हवा अजित कर्णे, पो हवा अजय जाधव, पो हवा प्रविण कांबळे, पो हवा लक्ष्मण जगधने, पो हवा अमित झेंडे, पो कों स्वप्नील दाँड, पो. कॉ. धिरज महाडीक, पोकों, संकेत निकम, यांनी तसेच बोरगाव व एलसीबीच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एम. बसवंत करीत आहेत.
स्थानिक बातम्या
कॉपर वायर व ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी टोळी गजाआड; 26 गुन्ह्यांची उकल, 20.22 लाखांचा मुद्देमाल जप्त.
- Wed 17th Jun 2026 05:32 pm
साताऱ्यात देशी पिस्टलसह संशयित जेरबंद; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
- Wed 17th Jun 2026 05:32 pm
सातारा जिल्ह्यातील शिवसेनेत शीतयुद्ध; लाभार्थ्यांची टोळी विरुद्ध निष्ठावंत - रणजितसिंह भोसले
- Wed 17th Jun 2026 05:32 pm
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Wed 17th Jun 2026 05:32 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Wed 17th Jun 2026 05:32 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 17th Jun 2026 05:32 pm
संबंधित बातम्या
-
साताऱ्यात देशी पिस्टलसह संशयित जेरबंद; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
- Wed 17th Jun 2026 05:32 pm
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Wed 17th Jun 2026 05:32 pm
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Wed 17th Jun 2026 05:32 pm
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Wed 17th Jun 2026 05:32 pm
-
फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची इंस्टाग्राम वरची पोस्ट डिलीट करण्यासाठी आजीम आतार याची शिवीगाळ व धमकी
- Wed 17th Jun 2026 05:32 pm
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Wed 17th Jun 2026 05:32 pm
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Wed 17th Jun 2026 05:32 pm










