साताऱ्यात देशी पिस्टलसह संशयित जेरबंद; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

सातारा : सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडसी कारवाई करत एका संशयितास अटक करून त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल, जिवंत काडतूस आणि मोटारसायकल असा एकूण १ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, कोरेगाव-सातारा मार्गावरील महागाव परिसरात एक व्यक्ती काळ्या रंगाच्या वेस्पा क्रमांक MH-11-DR-0981 या दुचाकीवरून गावठी पिस्टल विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महागाव येथील राजधानी हॉटेललगत सापळा रचला.

दरम्यान, संशयित आरोपीचे नाव ओमकार दत्तात्रय कदम (वय 23 रा. रामलिंग रोड कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा. सातारा) असे असून संशयित ओमकार कदम घटनास्थळी येताच पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल (मॅगझीनसह), एक जिवंत काडतूस आणि वेस्पा मोटारसायकल जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत १ लाख ५० हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये कलम ३(१), ७ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदर कारवाईमध्ये निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ.वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सपोनि रोहित फार्णे, पोउनि परितोष दातिर,  सफौ. राजु मुलाणी, अतीष घाडगे, पोहवा विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, लेलैश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, हणमंत भोसले, सुजित भोसले, अमित सपकाळ, अरुण पाटील, अमित माने, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, ओंकार यादव, किरण जगताप, स्वप्निल शिंदे, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, महेश निर्मळ, इरफान मुलाणी यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे. 

सहभागी अधिकारी अंमलदार यांचे पालीस अधीक्षक, सातारा, व अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला